घरमहाराष्ट्रCongress : आपल्या अडाणीपणाची हद्द पार करत..., महाराष्ट्र काँग्रेसचे कंगनावर टीकास्त्र

Congress : आपल्या अडाणीपणाची हद्द पार करत…, महाराष्ट्र काँग्रेसचे कंगनावर टीकास्त्र

Subscribe

मुंबई : नेहमीप्रमाणे वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौत हिला भाजपाने हिमाचल प्रदेशातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, तिने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सूर्याची उपमा देतानाच नेताजी सुभाषचंद्र बोस देणाचे पहिले पंतप्रधान होते, असे वक्तव्य केले आहे. त्यावरून महाराष्ट्र काँग्रेसने, आपल्या अडाणीपणाची हद्द पार केल्याची टीका तिच्यावर केली आहे.

हेही वाचा – Harish Salve : न्याय व्यवस्थेवर विशेष गटाचा दबाव; हरीश साळवेंसह 600 हून अधिक वकिलांचे CJI यांना पत्र

- Advertisement -

आझाद हिंद फौजेचे संस्थापक आणि महान स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान असल्याचे कंगना रणौतने म्हटले आहे. ज्या व्यक्तीने आपले रक्त सांडून आपल्याला स्वातंत्र्य दिले. जर्मनीपासून जपानपर्यंतच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यांना या देशाचे पंतप्रधान का केले नाही? अखेर ते कुठे गायब झाले? असे प्रश्न तिने उपस्थित केले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिने पंतप्रधान मोदी यांना सूर्याची उपमा दिली तर, विरोधी पक्षांचे नेते मेणबत्तीसारखे असल्याचे म्हटले आहे.

यावरून महाराष्ट्र काँग्रेसने ट्वीट करत कंगनावर टीका केली आहे. भाजपाचे दुर्दैव म्हणजे अडाणी लोकांना उमेदवारी देणे! कंगना रणौत नावाची राजकारणाचे शून्य ज्ञान असलेली बाई मुंबईला पीओके म्हणते, भारताला 2014 साली स्वातंत्र्य मिळाल्याचे सांगते, पण यावर कोणत्याही भाजपा नेत्याने ‘ब्र’सुद्धा काढला नाही, असे काँग्रेसने सुनावले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Vijay Wadettiwar : न्यायालयात दाद मागणार, रश्मी बर्वे प्रकरणी वडेट्टीवारांची संतप्त प्रतिक्रिया

आता आपल्या अडाणीपणाची हद्दपार करत नेताजी सुभाषचंद्र बोस यांना देशाचे पहिले पंतप्रधान का केले नाही, असा प्रश्न कंगनाने केला आहे. तिच्या माहितीसाठी हे सांगणे गरजेचे आहे की, 1945ला नेताजींचे अपघाती निधन झाले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू 1947ला त्या पदावर विराजमान झाले. मग निधनानंतर दोन वर्षांनी एखादी व्यक्ती देशाची पंतप्रधान कशी होऊ शकते, हे आता कंगनानेच संपूर्ण भारताला समजावून सांगावे, असे सांगून काँग्रेसने म्हटले आहे की, भाजपावाल्यांना वगळता समस्त देशवासीयांना नेताजींचा आदर आहे. पण हे भाजपावाले त्यांच्या नावाने सतत राजकारण करत आहेत, जी त्यांची वृत्तीच आहे.

हेही वाचा – Jayant Patil : ‘चारसौ पार’ची स्वप्ने पाहणाऱ्यांनी तरुणांची स्वप्ने चिरडून टाकली, जयंत पाटलांची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -