Thursday, May 16, 2024
घरमानिनीBeautyUpper Lips साठी करा 'हे' घरगुती उपाय

Upper Lips साठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Subscribe

अपर लिप्सपासून सुटका मिळवण्यासाठी महिला अनेक हेअर रिमूव्हल क्रीम, थ्रेडिंग, ब्लीच, वॅक्सिंग आणि अन्य मशीन याचा वापर करतात. बाजारात सुद्धा अपर लिप्स काढण्यासाठी अनेक मशीन उपलब्ध आहेत. या सर्व पद्धतीचा वापर करून तुम्ही तुमच्या अपर लिप्सपासून सुटका मिळवू शकता. पण, त्यानंतर पुन्हा अपर लिप्स येतात. जर तुमची जीवनशैली खूप व्यस्त असेल आणि तुम्हाला पार्लरला जाण्यास वेळ मिळत नसेल. मग, अशा वेळी तुम्ही घरगुती उपाय करून अपर लिप्सपासून सुटका मिळू शकते. यासाठी आज काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

- Advertisement -

 

कॉर्न फ्लोर आणि दूध

कॉर्न फ्लोर आणि दूध मिक्स करून यांची पेस्ट तयार करा. यानंतर तुम्ही अपर लिप्सवर ही पेस्ट लावा आणि 10 मिनिटासठी अशीच सोडून द्यावी. यानंतर हा मास्क काढल्यानंतर तुमचे अपर लिप्स जाता

- Advertisement -

अंड्याचा सफेद भाग

अंड्याचा सफेद भाग हा देखील अपर लिप्सवर चांगला उपाय आहे. तुम्ही अंड्याचा सफेद भाग अपर लिप्सवर लावा आणि अर्ध्या तासानंतर मसाज करून काढा आणि चेहरा पाण्यानी धुवा. यानंतर तुमचे अपर लिप्स गेले असतील.

बटाट्याचा रस

अपर लिप्ससाठी बटाट्याचा रस देखील खूप उपयुक्त मानला जातो. यासाठी बटाटा कापून मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट करा आणि एका कपड्याच्या मदतीने त्याचा रस काढून घ्या. त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी बटाट्याचा रस लावा. हा रस रात्रभर राहू द्या आणि सकाळी धुवा. ही प्रक्रिया आठवड्यातून तीन वेळा करा.

साखर

अपर लिप्स काढण्यासाठी साखरेचा सुद्धा वापर करू शकता. यासाठी एक भांडे घ्या आणि त्यात एक चमचा साखर आणि लिंबाचा रस घाला आणि हे मिश्रण एकजीव होऊपर्यंत मिक्स करा. पण, एक लक्षात ठेवा की, हे खूप गरम नसावे. 15 मिनिटे कोरडे होऊ द्या आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा.

दही, मध आणि हळद

दही, मध आणि हळद यांची एक पेस्ट तयार करून घ्या. यासाठी मोठा चमचा दही, मोठा चमचा बेसन आणि एक चिमूटभर हळद घेऊन मिक्स करा. यानंतर ही पेस्ट अपर लिप्सवर 15-20 मिनटपर्यंत ठेवू द्या.

मध आणि लिंबू

मध आणि लिंबूचा रस मिक्स करून घ्या. ही पेस्ट तुमच्या अपर लिप्सवर लावा. यानंतर 20 मिनिटसाठी हे असेच ठेवून द्या. यानंतर कोमट पाण्यानी स्वच्छ धुवून घ्या.


हेही वाचा – ड्राय स्किनसाठी घरीच बनवा Body Wash

 

- Advertisment -

Manini