Tuesday, April 30, 2024
घरमानिनीFashionघरच्या घरी करा पार्लरसारखे पेडीक्युअर मेडिक्युअर

घरच्या घरी करा पार्लरसारखे पेडीक्युअर मेडिक्युअर

Subscribe

सुंदर चेहऱ्यासोबतच हात-पायांचे सौंदर्यदेखील महत्वाचे असते. यामुळे अनेकजणी पार्लरमध्ये जातात. पार्लरमध्ये महागड्या ट्रिटमेंटही घेतात. पण काही दिवसांनंतर कामाच्या गडबडीत पुन्हा हात पाय काळवंटतात, नखं तुटू लागतात. यामुळे पुन्हा पेडीक्युअर मेडिक्युअरसाठी पैसे खर्च करणे सगळ्याचजणींना जमत नाही. पण खरं तर तुम्ही घरच्या घरीदेखील मॅनिक्युअर आणि पेडीक्युअर करू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मॅनिक्युअर आणि पेडीक्युअर नैसर्गिक पद्धतीने आणि पैसे न घालवता कसे करता येईल.

मॅनिक्युअर – 

- Advertisement -
  • पहिल्या स्टेपमध्ये कापसाच्या साहाय्याने हातांची नखे अॅसिटोनने स्वच्छ करावीत. त्यांना फाईलरने आकार द्यावा.
  • नंतर टबमध्ये कोमट पाणी आणि थोडासा शॅम्पू मिक्स करा आणि काही वेळासाठी त्यात हात भिजवा. नंतर पाणी गार झाल्यानंतर हात टॉवेलने स्वच्छ पुसून घ्या.

  • तिसऱ्या स्टेपमध्ये एका बाऊलमध्ये साखर आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करा. ही पेस्ट हाताला लावा. 10 मिनिटे हात स्क्रब करा. नंतर कोमट पाण्याने हात धुवा. आता ऑलिव्ह ऑइलने हातांना मसाज करा. यामुळे तुमचे हात मऊ होतील.
  • शेवटच्या टप्प्यात नखांवर तुमच्या आवडीची नेलपॉलिश लावा.

पेडीक्युअर –

- Advertisement -
  • सर्वप्रथम पायाची नखं स्वच्छ करा. नंतर नेल फाइलरने त्यांना आकार द्या.
  • तळपाय बुडेल एवढे टबमध्ये कोमट पाणी घ्यावे. त्यात शॅम्पू टाकावा.
  • त्यानंतर 10-15 मिनिटे पाय त्यात ठेवा.

  • पायांची त्वचा मऊ झाल्यावर नखे ब्रशने स्वच्छ करावीत.
  • टाच स्वच्छ करण्यासाठी आणि सर्व मृत त्वचा काढून टाकण्यासाठी प्युमिस स्टोन वापरा.
  • पायाला,बोटांना स्क्रब लावा. 10 मिनिटे मसाज करा.
  • नंतर कोमट पाण्याने पाय धुवावे.
  • नखांना नेलपेंट लावावी.

 

 

 


हेही पहा : Hair Removal Cream त्वचेसाठी हानिकारक

- Advertisment -

Manini