Tuesday, April 30, 2024
घरमानिनीपन्नाशीतील 'पॉवरफुल्ल' भावना

पन्नाशीतील ‘पॉवरफुल्ल’ भावना

Subscribe

मागील आठवड्यात झालेल्या यूकेच्या मँचेस्टर येथे वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप (मास्टर्स 3) मध्ये मागील पाच विक्रम मोडून एक नवा विक्रम रचत भावना यांनी उत्तंग भरारी घेतली आहे.

वयाच्या 50 व्या वर्षी स्त्रिया मुलं, संसार आणि नोकरी यामध्ये व्यस्त असतात. तर काही स्त्रिया स्वतःला घडवत असतात. यशाची नवीन शिखरं पार करत असतात. तर काही काही स्त्रियांचं करियर मागे पडतं जातं. पण या सगळया प्रवासात  भावना टोकेकर यांनी त्यांच्या पॅशनला आणि करियरला एक नवी दिशा दिली. भावना टोकेकर यांनी पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये यश संपादन करून अभिमानस्पद कामगिरी केली आहे. मागील आठवड्यात झालेल्या यूकेच्या मँचेस्टर येथे वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप (मास्टर्स 3) मध्ये मागील पाच विक्रम मोडून एक नवा विक्रम रचत भावना यांनी उत्तंग भरारी घेतली आहे.

हे ही वाचा – भारतातील ‘ही’ 5 पर्यंटनस्थळं आहेत महिलांसाठी सुरक्षित

- Advertisement -

8 सप्टेंबर 2020 रोजी फुल पॉवर लिफ्टिंग आणि बेंचप्रेस इव्हेंटमध्ये 75 किलो वजनी गटात मास्टर3 अॅथलीट (वय 50-54) या विभागात सहभाग घेत, भावना टोकेकर यांनी चार जागतिक विक्रम केले, दरम्यान डेडलिफ्टमध्ये भवना यांनी 132.5 किलो वजन उचलून विश्वविक्रम केला, तर यामध्येही यापूर्वीचा विक्रम 105 किलो होता. या स्पर्धेत भावना यांनी एकूण 315 किलो वजन उचलले, जो एक जागतिक विक्रम आहे, त्यानंतर त्यांनी 10 सप्टेंबर रोजी रॉ बेंच प्रेसमध्ये 77.5 किलो वजन उचलून यापूर्वीचा 75 किलो वजन उचलण्याचा विक्रम मोडला होता.

या विजयानंतर भावना टोकेकर यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “5 विश्वविक्रम मोडणे ही स्वतःमध्येच एक अद्भुत अनुभव आहे. मी जी मेहनत घेतली त्या मेहनीतीची फळं मला आता मिळत आहेत. मी जे योगदान त्याचा मला खूप आनंद आहे अश्या शब्दांत भावना यांनी आपले भावना व्यक्त केल्या.

- Advertisement -

याआधी 2019 मध्ये, भावना यांनी रशिया मध्ये झालेल्या आशियाई ओपन चॅम्पियनशिपमध्ये पॉवरलिफ्टिंग मास्टर 2 (40-50 वयोगट) मध्ये चार सुवर्ण पदकं जिंकली होती. त्या नंतर आता तीन वर्ष उलटून गेल्या नंतर पुन्हा चार विश्वविक्रम मोडत त्यांनी यशाची शिखरे पादाक्रांत केली. पण भावना यांच्या या यशस्वी प्रवास काही सोपा नव्हता. पॉवरलिफ्टिंगच्या त्यांच्या सुरुवातीच्या काळात भावना यांना वयाच्या 40 व्या वर्षी भावना यांना स्किन इन्फेक्शनला सामोरं जावं लागलं. त्यांच्या तवचेवर ऍलर्जी झाल्याचे निदान झाले. त्यामुळे त्यांना बरं होण्यासाठी अँटी-एलर्जीसह विविध औषधे घेत असे. त्या औषधांच्या दुष्परिणामांमुळे त्यांना खूप झोप सुद्धा यायची. खूप थकवा सुद्धा जाणवायचा पण अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी जिंकण्याची जिद्द सोडली नाही. त्या मेहनत घेऊन परिश्रम करत होत्या.

हे ही वाचा – नवरात्रीच्या उपवासाला ‘अरबी कोफ्ते’ नक्की ट्राय करा

याही परिस्थितीत त्यांनी वर्कआऊट आणि वेट ट्रेनिंग सुरूच ठेवली. भावना यांचे पती भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन आहेत. पती श्रीपाद टोकेकर यांच्यासोबत त्या सुरुवातीच्या काळात जिम करत असे. त्याचा वर्कआउट पाहता वायुसेनेच्या बॉडी बिल्डिंग टीमच्या सल्ल्यानुसार त्याने वेट ट्रेनिंगसुद्धा सुरू केले, जे त्यांना अत्यंत फ्रायदेशीर ठरले. या सगळ्यात भावना यांना त्यांच्या पतीची साथ मिळाली.भावना यांना ईशान(वय वर्ष २२) आणि आरव(वय वर्ष १८) दोन नावाची मुलं सुद्धा आहेत. भावना या आज पर्यंत स्वतःच्या तत्वांवर जगत आल्या आहेत. भावना यांनी जो निश्चय आणि निर्धार केला. त्याला त्यांनी प्रामाणिक प्रयत्नांची जोड दिली आणि स्वतःचं ध्येय गाठलं.

हे ही वाचा –  ऑफिसमधील ‘या’ 5 प्रकारचे लोक आहेत तुमच्यासाठी घातक

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -

Manini