Friday, February 7, 2025
HomeमानिनीRecipeChicken Sukka Recipe - चिकन सुक्का

Chicken Sukka Recipe – चिकन सुक्का

Subscribe

मांसाहारींना प्रिय असलेल्या चिकनपासून अनेक डिशेस बनता येतात. यात चिकन मसाला, चिकन करी , चिकन सुक्का या काही लोकप्रिय डिशेस आहेत. आज आपण यातील चिकन सुक्काची रेसिपी बघूया. बनायला झटपट आणि खाण्यास यमी असलेला चिकन सुक्का बनवणही सोपं आहे.

साहीत्य-

अर्धा किलो चिकन
१ वाटी ओला किंवा सुकं खोबर किसलेलं( भाजलेले)
२ मध्यम आकाराचे कांदे( बारीक चिरलेले)
२ चमचे कांदा लसूण मसाला
२ चमचे चिकन मसाला
3 लवंगा
४ काळीमिरी ,
१ तुकडा दालचिनी,
१ चक्रफुल
१ चमचा शाहाजीरे,
२ तमालपत्र
३ चमचे तेल

चिकनला मॅरिनेट करण्यासाठी साहीत्य
२ चमचे आलं लसूण पेस्ट,
१ चमचा हळद,
२ चमचे लाल तिखट
मीठ

कृती– सर्वप्रथम चिकनला वरती दिलेला मसाला लावावा. मॅरिनेटसाठी एक तास चिकन तसेच ठेवावे.
त्यानंतर पातेल्यात तेल गरम करून घ्यावे. नंतर त्यात कांदा लालसर परतून घ्यावा. मॅरिनेट केलेले चिकन टाकून २-३ मिनिट परतावे. चांगले परतून झाल्यानंतर त्यात अंदाजे गरम पाणी घालून मंदर आचेवर चिकन शिजू द्यावे. चिकन शिजले की बाहेर काढून ठेवावे. रस्सा घट्ट होईपर्यंत उकळवावा. त्यात कांदा खोबरं आणि इतर मसाले टाकावेत. नंतर चिकन टाकून परतून घ्यावे.

 

Manini