घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : उदयनराजेंना उमेदवारी देण्यात वेळ का लागला त्याचे...

Lok Sabha Election 2024 : उदयनराजेंना उमेदवारी देण्यात वेळ का लागला त्याचे आत्मपरिक्षण करा; भाजपला सवाल कोणाचा?

Subscribe

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. अनेक मतदारसंघात अद्याप उमेदवार जाहीर करणे बाकी आहे. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. कारण सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विरुद्ध भाजप अशी लढत असणार आहे.

सातारा : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. अनेक मतदारसंघात अद्याप उमेदवार जाहीर करणे बाकी आहे. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. कारण सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विरुद्ध भाजप अशी लढत असणार आहे. अशात, या मतदारसंघातून आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अभिजीत बिचुकले यांनी उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारीवरून भाजपवर निशाणा साधला आहे. (Lok Sabha Election 2024 Abjijeet Bichukale Slams BJP in satara constitution)

सातारा लोकसभा मतदारसंघातून अभिजीत बिचुकले हे लोकसभेचा अर्ज भरणार आहेत. 19 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज अभिजीत बिचुकले दाखल करणार आहेत. तसेच, आपली उमेदवारीचा घोषणा करताना खासदार म्हणून निवडून आल्यावर कोणती कामे करणार हे देखील अभिजित बिचुकले यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे आपली उमेदवारी जाहीर करताना अभिजीत बिचुकले यांनी भाजपवर निशाणा साधला. “भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची उदयन दादांची इच्छा होती, ती पूर्ण झाली. पण भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी आणि लोकांनी पण करावे”, असा सल्लाही अभिजीत बिचुकलेंनी भाजपला दिला.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : वर्षावर राजकीय बैठक नाहीत, मुख्यमंत्री कार्यालयाचा आयोगाकडे खुलासा

- Advertisement -

याशिवाय, लोकसभा निवडणुकीत मला निवडून दिले तर, मी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाचा पाठपुरावा करणार असल्याचेही अभिजीत बिचुकलेंनी सांगितले. त्यानुसार, “समुद्रातील छत्रपतींच्या स्मारक होण्याबाबत पाठपुरावा करणार आहे. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. पण, स्मारकाची एक विटही रचली नाही”, अशी टीका बिचुकले यांनी केली. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस म्हणून माझ्या पाठिशी उभे राहा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, “2004, 2009, 2014, 2019 च्या निवडणुकीत मला चांगला पाठिंबा दिला. आता देखील मी निवडणूक अर्ज दाखल करणार आहे. मतदारराजा जागृत झाला पाहिजेदोन रुपयाची दारू पाजून, मटण देऊन शक्ती प्रदर्शन केलं जात नाही”, अशी टीकाही यावेळी अभिजीत बिचकुलेंनी केली.


हेही वाचा – SANJAY RAUT : बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करा, राऊतांचा काँग्रेसला सल्ला

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -