Thursday, May 16, 2024
घरमानिनीDiaryनशेमध्ये मित्राबरोबर इंटीमेटनंतर गर्भपात, वादग्रस्त आहे 'या' अभिनेत्रीचे आयुष्य

नशेमध्ये मित्राबरोबर इंटीमेटनंतर गर्भपात, वादग्रस्त आहे ‘या’ अभिनेत्रीचे आयुष्य

Subscribe

नेटफ्लिक्सवर ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सीरीज नावाजलेली आहे. या वेब सीरीजमध्ये प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री कुब्रा सैत ही चित्रपटात जरी फ्लॉप असली तरीही ती ओटीटीवर प्रसिद्ध अभिनेत्री आहे. कुब्रा सैत ही काजोलसोबत ‘द ट्रायल’ या वेबसिरीजमध्ये दिसून आली आहे. या वेब सिरीजमध्ये कुब्राला खूप सक्सेस मिळाला की नाही हे माहिती नाही. पण, या अभिनेत्रीच्या व्यतिगत आयुष्यात बघितले तर तिने चित्रपटापेक्षा जास्त कंट्रोवर्सीने लोकांचे लक्ष वेधले आहे.

कुब्रा सैने तिच्या ऑटो बायोग्राफी ‘ओपन बुक नॉट क्वाइट ए मेमॉयर’ यात तिने तिच्या आयुष्यातील अनेक डार्क सीक्रेट्स जगाला सांगितले आहेत. कुब्रा हिच्या ऑटो बायोग्राफी एकूण 24 धडे आहेत. यात अभिनेत्रीने कुब्रा सैने प्रेग्नेंसीसंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. यातील एका धड्यात अभिनेत्रीने तिच्या वन नाइट स्टँडबद्दल सांगितले आहे.

- Advertisement -

कुब्रा म्हणते की, 2013 मध्ये जेव्हा ती 30 वर्षाची होती. तेव्हा ती अंदमान ट्रिपवर गेली होती. या ट्रिमदरम्यान ती नशेत असताना तिने तिच्या मित्रासोबत फिझिकल झाली होती. यानंतर काही दिवसांनी तिचे पीरियड्स चुकले आणि तिचे प्रेग्नेंसी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. अभिनेत्रीने हा धक्कादायक खुलासा केल्याने खूप कंट्रोवर्सी देखील झाली आहे.

- Advertisement -

प्रेग्नेंट आणि अबॉर्शन

यानंतर कुब्रा हिने टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगले की, मी प्रेग्नेंट झाल्याचे समजल्यानंतर आठवड्याभरात अबॉर्शन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मी तयार नव्हते. मला वाटते नाही की, मी आताही तयार आहे. मला कळत नाही की, मुलींना 23 व्या वर्षी लग्न आणि 30 व्या वर्षी मुलांना जन्म देण्याचा दबाव का दिला जातो? मला माहिती होती की, मी यासाठी तयार नाही आणि याबद्दल मला काही दु:ख देखील नाही. वयाच्या 17 व्या वर्षी कुब्रा सैतला लैंगिक शोषण झाल्याचे तिने सांगिले आहे. अभिनेत्री म्हणते की, तिचे वयाच्या 17 व्या वर्षी लैंगिक शोषण झाले आहे. तिच्या जवळच्या काकाने तिचे लैंगिक शौषण केले होते.

बॉलिवूड आणि ओटीटी करिअर

कुब्राने हिच्या आयुष्यात अनेक डार्क सीक्रेटचा खुलासा केला आहेत. पण, या अभिनेत्रीच्या चित्रपट करिअरबद्दल सांगायचे झाले तर तिने सलमान खानच्या ‘रेडी’ चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. या चित्रपटात कुब्राची खूप छोटी भूमिका होती. कुब्रा हिला सेक्रेड गेम्सपासून प्रसिद्ध मिळाली. आता ही काजोल सोबत द ट्रायल या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ही वेबसीरिज 14 जुलैला स्ट्रीम होणार आहे.


हेही वाचा – Diary: जेव्हा मनीषा कोइरालाने सांगितले घटस्फोटाचे कारण…

- Advertisment -

Manini