घरमनोरंजनUrfi Javed : पहिल्यांदाच उर्फीच्या ड्रेसचं कौतुक, उर्फीचा तो व्हिडीओ व्हायरल

Urfi Javed : पहिल्यांदाच उर्फीच्या ड्रेसचं कौतुक, उर्फीचा तो व्हिडीओ व्हायरल

Subscribe

‘बिग बॉस ओटीटी’फेम उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. तिचा फॅशन सेन्स आणि ड्रेस नेहमीच चर्चेत असतात. उर्फी ही तिच्या हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते. गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद ही सातत्याने चर्चेत आहे. तिच्या अतरंगी फॅशनमुळे ती अनेकदा वादातही सापडली आहे.

मात्र पहिल्यांदाच असं घडलंय की उर्फीने नेटकऱ्यांना तिचं कौतुक करायला भाग पाडलं आहे. होय.. हे खरंच घडलंय. उर्फीचा नवा लूक पाहिल्यानंतर नेटकरीही थक्क झाले आहेत. त्यांनी तिच्या या लूकचं आणि फॅशन सेन्सचं प्रचंड कौतुक केलं आहे. इतकंच काय तर काहींनी तिची तुलना थेट बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्याशी केली आहे.

- Advertisement -

उर्फी तिच्या नव्या लूकमध्ये जेव्हा पापाराझींसमोर आली, तेव्हा सर्वजण चकीत झाले होते. तिने काळ्या रंगाचा मोठा गाऊन परिधान केला होता आणि त्यावर पाना-फुलांची डिझाइन होती. पापाराझी फोटो आणि व्हिडीओ शूट करण्यासाठी आले तेव्हा उर्फीने (Urfi Javed) टाळ्या वाजवताच तिच्या ड्रेसवरील पाना-फुलांच्या डिझायनमधून कागदी फुलपाखरू उडून खाली पडले. उर्फीचा हा जादूई ड्रेस नेटकरी आणि चाहत्यांना प्रचंड आवडला. उर्फीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

 उर्फीच्या परिधान केलेल्या गाऊनवर नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. ‘काही म्हणा पण ही मुलगी मेहनत करते’, असं एकाने कमेंट करत तिचं कौतुक केलंय. तर एकाने ‘पहिल्यांदाच उर्फीने सुंदर ड्रेस परिधान केलाय’, ‘जेव्हा इंजीनिअर आणि फॅशन डिझाइनर यांची भेट होते..’, अशाही प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -