Sunday, April 28, 2024
घरमानिनीDiaryDiary: जेव्हा मनीषा कोइरालाने सांगितले घटस्फोटाचे कारण...

Diary: जेव्हा मनीषा कोइरालाने सांगितले घटस्फोटाचे कारण…

Subscribe

नेपाळच्या राजघराण्याशी संबंध ठेवणारी मनीषा कोइरालाने आपल्या मेहनतीवर बॉलिवूड इंडस्ट्रीत दमदार एन्ट्री केली होती. सौंदर्य आणि आपल्या अदांनी प्रेक्षकांवर भुरळ पाडणाऱ्या या अभिनेत्रीवर सर्वजण फिदा होते. मात्र जेव्हा तिने 2010 मध्ये नेपाळ मधील व्यावसायिक सम्राट दहल याच्यासोबत लग्न केले तेव्हा सर्वजण हैराण झाले. त्यापेक्षा अधिक धक्का तेव्हा बसला जेव्हा अभिनेत्रीने केवळ दोन वर्षातच त्याच्यापासून घटस्फोट घेतला आणि त्याबद्दल सांगितले सुद्धा. (Manisha Koirala)

लव्ह मॅरेज केवळ दोन वर्षच टिकले. असे होईल याचा विचार मनीषा कोइरालाने सुद्धा केला नव्हता. एका मुलाखतीत अभिनेत्रीने याबद्दल सांगितले होते. तिने जे घटस्फोटाचे कारण सांगितले त्यामधून सर्वांनी काहीतरी खरंच बोध घेतला पाहिजे.

- Advertisement -

आयएनएसच्या एका रिपोर्ट्सनुसार, मनीषाने एका मुलाखतीत आपल्या वैवाहिक आयुष्याव भाष्य करत ते मोडण्याचे कारण मी च होती असे स्पष्ट केले होते. तिने आपल्या भावना व्यक्त करत म्हटले होते की, मी लग्नासाठी खुप घाई केली आणि नंतर असे कळले की, मी त्यासाठी योग्य नाही. समोरच्या व्यक्तीची काहीही चुक नाही. जे काही झाले त्यामध्ये संपूर्ण चुक माझीच आहे.

मनीषाने असे ही म्हटले होते की, तिने घटस्फोटाचा निर्णय का घेतला होता. लग्न करणे हे माझ्यासाठी एका स्वप्नासारखे होते. जेव्हा तुम्हा एखाद्या चुकीच्या नात्यात असता तेव्हा तुम्ही विभक्त झालात तरच बरं असते. तिच्या मनात एक्स पार्टनरबद्दल कोणत्याही प्रकारचे दु:ख नाही असे ही तिने म्हटले होते.

- Advertisement -

मनीषासोबत जे झाले त्यामधून सर्वांनी बोध घेतला पाहिजे. लग्न म्हणजे आयुष्याची एक नवी सुरुवात असे म्हटले जाते. परंतु याचा अर्थ असा होत नाही की, आयुष्यात जे काही सुरु आहे ते बदलणार असते. काही वेळेस लोक आपल्या प्रेयसी किंवा प्रियकराला आपला आयुष्यभराचा जीवनसाथी बनवण्यास फार उत्सुक असतात. पण ते विसरतात की, लग्नासोबत किती जबाबदाऱ्या आणि अन्य काही गोष्टी येतात. अशातच उत्सुकता आणि घाईघाईत लग्न केल्यानंतर आयुष्यात जेव्हा समस्या येऊ लागता तेव्हा ती स्थिती सांभाळली जात नाही.

त्यामुळे लग्नाची निर्णय हा फार विचार करून घेतला पाहिजे. तसेच लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्ही व्यवस्थितीत पार पाडू शकता का याचा सुद्धा विचार केला पाहिजे. मनात पार्टनर बद्दल कोणतीही शंका, संशय असेल तर ती लग्नापूर्वीच दूर करा.


हेही वाचा- विवाहित धर्मेंद्र बरोबर हेमा मालिनीच्या नात्याला होता घरच्यांचा विरोध

- Advertisment -

Manini