Sunday, May 12, 2024
घरमानिनीDiaryविवाहित धर्मेंद्र बरोबर हेमा मालिनीच्या नात्याला होता घरच्यांचा विरोध

विवाहित धर्मेंद्र बरोबर हेमा मालिनीच्या नात्याला होता घरच्यांचा विरोध

Subscribe

बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे दोघेही फिल्म इंडस्ट्रीचे आयकोनिक कपल्स मानले जातात. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रेम कहानीचे अनेक किस्से सर्वांनी ऐकले आहेत. धर्मेंद्रचा पहिला विवाह त्यांच्या घरच्या संमतीने प्रकाश कौर यांच्यासोबत झाला होता. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये विवाह बंधनात अडकले. यानंतर हेमा मालिनी या धर्मेंद्रच्या दुसरी पत्नी झाल्या. परंतु, या विवाहला हेमा मालिनीच्या कुटुंबियांनी प्रचंड विरोध केला होता. खास करून हेमा मालिनींचे वडिल हे त्यांच्या नात्याबद्दल फार खूप नव्हते कारण धर्मेंद्र यांचे पहिले लग्न झाले होते.

हेमा मालिनी यांनी त्यांच्या जुन्या मुलाखतीमध्ये खुलासा केला की, धर्मेंद्र यांचे पहिले लग्न झाले असल्यामुळे त्यांचे वडिल हे त्यांच्या लग्नाबद्दल खूश नव्हते. जेव्हा हेम मालिनींना विचारले की,धर्मेंद्र आणि तुमचा विवाह झाल्यानंतरही तुमचे वडिल हे नाराज होते का? यावर त्या म्हणाल्या, होय, माझ्या वडिलांचे नाराज होणे, हे स्वाभाविक होते. कारण धर्मेंद्र यांचा पहिला विवाह झाला होता.

- Advertisement -

हेमा मालिनीसाठी स्वीकारला इस्लाम धर्म

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेम कहानी आणि लग्नाचे अनेक किस्से आहेत. हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. परंतु, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र या दोघांनी या सर्व बातम्या खोट्या असल्याचे सांगितले. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना दोन मुली आहेत.

- Advertisement -

धर्मेंद्र यांचा पहिला विवाह

धर्मेंद्र हे 19 वर्षाचे असताना त्यांच्या कुटुंबियांनी प्रकाश कौर यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला.  धर्मेंद्र आणि प्रकाश कौर या या दोघांना 2 मुले आणि 2 मुली आहेत. सनी आणि बॉबी ही धर्मेंद्रची दोन्ही मुले बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात अधिकाराज्य करत आहेत तर त्यांच्या दोन मुलींचा विवाह झाला आहे. धर्मेंद्र दुसरा विवाह केला तरी ही त्यांनी त्यांच्या चारही मुलांवर खूप प्रेम करतात. हे ही तितकेच खरे आहे की, धर्मेंद्र हे दोन्ही कुटुंब एकमेकांपासून लांब ठेवणे जास्त पसंद करतात.

सनी देओलच्या मुलांचे लग्न

नुकतेच सनी देओलचा मुलगा करण देओल यांचा विवाह सोहला थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. परंतु, हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींनी करण देओलच्या लग्नाला आल्या नाहीत.


हेही वाचा – वयाच्या 16 व्या वर्षी सुपरस्टारसोबत लग्न; डिंपल कपाडिया यांचा असा प्रवास

- Advertisment -

Manini