घरक्राइमSalman Khan Home Firing : आत्महत्या नव्हे हत्याच; सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या...

Salman Khan Home Firing : आत्महत्या नव्हे हत्याच; सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबीयांचा आरोप

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. 14 एप्रिल रोजी हा गोळीबार झाला असून पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली होती. त्यापैकी एका आरोपीने पोलीस कोठडीत गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. अनुज थापन (32) असे त्या आरोपीचे नाव होते. अनुजच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. 14 एप्रिल रोजी हा गोळीबार झाला असून पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली होती. त्यापैकी एका आरोपीने पोलीस कोठडीत गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. अनुज थापन (32) असे त्या आरोपीचे नाव होते. अनुजच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार, अनुज याची कथितरित्या हत्या करण्यात आली आहे, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. (Salman Khan Home Firing Case Accused Families Statement On His Death Claims It Was A Murder vvp96)

मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय अनुजने मुंबई पोलिसांच्या मुख्यालयातील कोठडीत बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 12 वाजताच्या सुमारास आरोपींना दिलेल्या चादरीचा तुकडा फाडून तो शौचालयात गेला. तिथेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 1 वाजताच्या सुमारास इतर एका आरोपीने हा प्रकार पाहिला आणि त्याने आरडाओरडा करून पोलिसांना बोलावले. त्यानंतर थापनला तातडीने जीटी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास करण्यात येणार आहे.

- Advertisement -

अनुजच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांना अनेक आरोप केले आहेत. त्यानुसार, अनुजने आत्महत्या केली नाही, तर त्याची हत्या झाली आहे, असा आरोप त्याचा भाऊ अभिषेक थापन याने केला आहे. तसेच, ‘आम्ही गरीब कुटुंबातील आहोत. माझा भाऊ ट्रकवर मदतनीस म्हणून काम करायचा. त्याने जेलमध्ये आत्महत्या केली नाही. त्याचा खून झाला आहे. त्याला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे. 6-7 दिवसांपूर्वी मुंबई पोलिस त्याला संगरूर येथून घेऊन गेले आणि आजा आम्हाला फोन आला की त्याने आत्महत्या केली. तो असा नव्हता. पोलिसांनी त्याची हत्या केली”, असाही आरोप अनुजचा भाऊ अभिषेक याने केला.

अनुजला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी रुग्णालयात जाऊन प्राथमिक माहिती घेतली. त्यानंतर थापनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे रुग्णालयात पाठविला. यावरूनही त्याच्या कुटुंबियांनी मागणी केली आहे. त्यानुसार, ‘अनुज थापनच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम व्हावे. हे शवविच्छेदन मुंबईबाहेर करावे’, अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे आहे. शिवाय, त्यांच्या छळामुळेच अनुजचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी पोलिसांवर केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, आत्महत्या केलेला थापन हा ट्रकवर मदतनीस म्हणून कामाला होता. तो बिष्णोई गँगशी संबंधित होता. त्याच्याविरोधात खंडणी, शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना दोन पिस्तुलं आणि 40 जिवंत काडतुसं पुरविल्याचा त्याच्यावर आरोप होता. हत्यारे देण्यासाठी तो 15 मार्चला पनवेलला आला होता. गोळीबार करणारे आरोपी विकी गुप्ता आणि सागर पाल यांना पिस्तुल देण्यापूर्वी चंदर आणि थापन यांनी दोन गोळ्या झाडल्याचाही संशय आहे.


हेही वाचा – Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबारप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी; चौघांना मोक्का

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -