Friday, April 26, 2024
घरमानिनीDiaryवयाच्या 16 व्या वर्षी सुपरस्टारसोबत लग्न; डिंपल कपाडिया यांचा असा प्रवास

वयाच्या 16 व्या वर्षी सुपरस्टारसोबत लग्न; डिंपल कपाडिया यांचा असा प्रवास

Subscribe

वयाच्या 15 व्या वर्षी अभिनेत्री झालेल्या डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांचा आज 66 वा वाढदिवस आहे. डिंपलने 1972 मध्ये बॉबी या हिंदी सिनेमात पदार्पण केले. डिंपल यांच्या करिअरची सुरुवातीचा प्रवास हा खडतर आहे.  14 व्या वर्षी राज कपूर (Raj Kapoor) यांची फिल्म मिळाली, 15 वर्षी ऋषि कपूर यांच्यासोबत अफेअरच्या चर्चा रंगल्या. त्या दरम्यानच्या काळात भारतीय सिनेमाचे पहिले सुपरस्टार आणि त्यांचा आवडता अभिनेता राजेश खन्ना () यांनी डिंपल यांना लग्नासाठी प्रपोज केले आणि पहिला सिनेमा रिलीज झाल्यानंतर अवघ्या वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी लग्न केले. आणि 17 व्या वर्षी एका मुलीची आई झाल्या.

डिंपल कपाडिया यांनी सुपरस्टार पतीसाठी आपले करिअरला ब्रेक दिला. यानंतर डिंपल कपाडियांनी तब्बल 10 वर्षानंतर हिंदी सिनेमात कमबॅक केला. डिंपल कपाडिया यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांच्या आयुष्याचे काही किस्से आपण आज जाणून घेऊ या.

- Advertisement -

 डिंपल यांचे खरे नाव अमीना

8 जून 1957 साली डिंपल यांचा जन्म गुजरातचे उद्योपती चुन्नीभाई यांच्या घरी झाला.  डिंपल यांचे नाव 48 वे इमाम आगा खान – 3 यांनी अमीना हे नाव दिले. डिंपल ही चार बहिण-भावानेमध्ये सर्वात मोठी होती. डिंपल यांचे वडिल हे मोठे उद्योजक होते.  डिंपलच्या वडिलांचे मोठ-मोठ्या फिल्म इंडस्ट्रीतील लोकांशी उठणे बसणे होईल. डिंपल यांचे शालेय शिक्षण जोसेफ कॉन्वेंट स्कूलमध्ये शिक्षण झाले आहे. डिंपल या ऐवढ्या सुंदर होत्या की, त्याला लहान वयात चित्रपटात काम करण्याची ऑफर आली.

- Advertisement -

वडिलांच्या मदतीने डिंपलला मिळाला पहिला चित्रपट

वडिलांचे इंडस्ट्रीतमध्ये ओळख असल्यामुळे डिंपलला  एच.एस. रवैल यांच्या संघर्ष या चित्रपटात काम मिळाले. या चित्रपटात डिंपल वैजयंती मालाच्या बालपणीची भूमिका साकारणार होती, पण, ती लूकमध्ये इतकी मॅच्युअर दिसत असल्यामुळे त्यांना चित्रपटातून काढून टाकण्यात आले. त्याचवेळी डिंपलने 1970 मध्ये आलेला गुड्डी चित्रपटही नाकारला.

१४ व्या वर्षी राज कपूरचा बॉबी चित्रपट कसा मिळाला?

चित्रपट निर्मिते राज कपूर कर्जबाजारी झाले होते. कर्जातून सावरण्यासाठी त्या बॉबी हा चित्रपट करत होता. त्यावेळी राज कपूर यांचे बजेट कमी होते, त्यामुळे चित्रपटात मोठा हिरो घेण्याऐवजी राज कपूरने मुलगा ऋषी कपूरला कास्ट केले.

या चित्रपटासाठी तो नव्या चेहऱ्याच्या शोधात होता, ज्यासाठी त्याने वर्तमानपत्रात जाहिरात दिली. ती जाहिरात पाहताच डिंपलने तिच्या मैत्रिणींना सांगितले, बघ मी या चित्रपटाची हिरोईन होणार आहे. दुसऱ्या दिवशी, डिंपल आरके स्टुडिओमध्ये पोहोचली, जिथे तिची स्क्रीन टेस्ट होती. तिची चाचणी पाहिल्यानंतर राज कपूरने तिला कास्ट करण्यास नकार दिला कारण ती चित्रपटातील नायक ऋषी कपूरपेक्षा वयाने मोठी दिसत होती.

राज कपूरचा मित्रही डिंपलच्या वडिलांचा मित्र होता, त्यामुळे त्याला आणखी एक संधी देण्यात आली. दुसऱ्या स्क्रीन टेस्टमध्ये डिंपलची निवड झाली. बॉबी (1972) मध्ये डिंपलला ऋषी कपूर सोबत कास्ट करण्यात आले होते.

या सिनेमासाठी राज कपूर यांना फ्रेश चेहरा हवा होता. यासाठी राज कपूर यांनी वृत्तपत्रात जाहिराती दिल्या होत्या. डिंपल यांनी ती जाहिरात पाहिली. यानंत दुसऱ्याच दिवशी डिंपल RK स्टुडिओ गेली आणि स्क्रीन टेस्ट दिला. डिंपल यांचा स्क्रीन टेस्ट पाहिल्यानंतर राज कपूर यांनी त्यांना बॉबी सिनेमात कास्ट करण्यास नकार दिला. कारण, डिंपल या ऋषि कपूर यांच्या पेक्षा वयाने मोठ्या दिसत होत्या. परंतु, डिंपलचे वडिल हे राज कपूर यांचे देखील मित्र असल्यामुळे त्यांनी डिंपलला पुन्हा एकदा संधी दिली आणि दुसऱ्या स्क्रीन टेस्टमध्ये डिंपलला सिलेक्ट केले. यानंतर डिंपल आणि ऋषि यांचा बॉपी हा चित्रपट कास्ट केले.

बॉबी चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान ऋषिसोबत जवळीक वाढली

बॉबी चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान 21 वर्षाच्या ऋषि यांच्यासोबत घट मैत्री झाली होती. ऋषि कपूर यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये सांगितले की, डिंपल आणि ऋषि हे दोघे ही खूप चांगले मित्र झाले होते. चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान ऋषिची अंगठी डिंपल यांच्या हातात पाहिली होती. यामुळे हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, राजेश खन्नामुळे त्यांची मैत्री तुटली.

राजेश खन्नांना पहिल्या बेटी डिंपलसोबत झाले प्रेम

नवरंगपुरा स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या  एका कार्यक्रमात राजेश खन्ना हे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमात डिंपल देखील पोहोचल्या होत्या. सुंदर डिंपलला पाहून राजेश खन्ना यांना त्या आवडल्या होत्या. ही मुलगी जर चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम केले तर खूप चांगले होईल, असे त्यांनी त्यांच्या मित्रांना म्हटले होते. यानंतर राजेश खन्ना यांच्या मित्रांनी लगेचच डिंपल यांना बोलवून घेतले आणि डिंपल यांची राजेश खन्ना यांच्यासोबत भेट घडविली. त्यावेळी डिंपल यांनी सांगितले की, त्या राजेश खन्नाच्या फॅन आहेत आणि त्यांनी बॉबी चित्रपट साइन केला आहे.

राजेश खन्नांनी लग्नासाठी केली मागणी, आठवडाभरात लग्न करावे

कधी विमानात तर कधी कुठल्यातरी कार्यक्रमात दोघींची भेट झाली. फ्लाइटमध्ये डिंपलनेही राजेशला पसंत असल्याचा इशारा दिला. तेव्हा त्या मुंबईला परतताच तिच्या घरी पोहोचला. राजेश खन्ना हे सुपरस्टार होते, त्यांना नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. घरच्यांनी होकार दिल्यावर राजेशने आठवडाभरात लग्न करावे, अशी अट घातली. लग्नाच्या तारखा डिंपलच्या बॉबी चित्रपटाच्या तारखांशी टक्कर देत होत्या, पण राजेश खन्नाच्या अटीमुळे काही दिवस शूटिंग थांबवावे लागले. 27 मार्च 1973 रोजी दोघांचे लग्न झाले तेव्हा राजेश 31 वर्षांचा होता आणि डिंपल 16 वर्षांची होती. राजेश खन्ना आणि डिंपलचे लग्न हे त्या वर्षातील सर्वात मोठे लग्न ठरले होते, तर त्याच वर्षी अमिताभ-जया आणि राखी-गुलजार यांच्या लग्नाने फारशी हेडलाईन केली नाही.


हेही वाचा – स्फोटात गमावले दोन्ही हात, राष्ट्रपतींकडून सन्मान, कोण आहे मालविका अय्यर

- Advertisment -

Manini