Sunday, February 25, 2024
घरमानिनीDiaryनयना जयस्वालने रचला इतिहास ; २२ व्या वर्षी मिळवली डॉक्टरेट पदवी

नयना जयस्वालने रचला इतिहास ; २२ व्या वर्षी मिळवली डॉक्टरेट पदवी

Subscribe

नयना जयस्वाल या तरुणीने वयाच्या २२ व्या वर्षी देशातील सर्वांत तरुण डॉक्टरेट पदवी प्राप्त करून नवा विक्रम तयार केला आहे. तेलंगणातील मेहबूब नगरमधील रहिवासी असलेली नयना लहानपणापासूनच हुशार आहे. अवघ्या १७ व्या वर्षी नयनाने पीएच.डी.चा अभ्यास सुरू केला होता. महिला सक्षमीकरणासाठी मायक्रो फायनान्सचे योगदान किती आहे या विषयात तिने पीएच.डी. पूर्ण केली आहे.

ज्या वयात मुलं लिहायला वाचायला शिकतात त्या वयात नयना शालेय शिक्षणातील महत्वाचा टप्पा असणारी दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाली आहे. वयाच्या 13 व्या वर्षी तिने पत्रकारिता व जनसंवादाची पदवी मिळवली आहे. त्यानंतर वयाच्या 15 व्या वर्षी नयना उस्मानिया विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. आशियातील सर्वात तरुण पदव्युत्तर पदवीधर असण्याचा विक्रम तिने रचला आहे.

- Advertisement -

नयना केवळ अभ्यासातच नाही तर नयना खेळातही निपुण आहे. नयना ही आंतरराष्ट्रीय दर्जाची टेनिसपटू आहे. टेबल टेनिस खेळात नयनाने राष्टीय व दक्षिण आशिया चॅम्पियनशिपचा किताब पटकावलं आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळामध्ये तिने अनेक सुवर्ण, रौप्य व कास्यपदके मिळवली आहेत. नयना ही एक आंतरराष्ट्रीय प्रेरक वक्ताही आहे. तिने जगभरातील अनेक चर्चासत्रांमध्ये भाग घेतला आहे.

- Advertisement -

आशियातील सर्वांत तरुण पदव्युत्तर पदवीधर असण्याचा विक्रम तिने रचला आहे. फक्त अभ्यासच नाही तर नयना खेळातही निपुण आहे. नयना ही आंतरराष्ट्रीय दर्जाची टेनिस पटू आहे. तेलगंणातील मेहबूबनगरमधील रहिवासी असलेल्या नयनाच्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

 

 


हेही वाचा; 97 वर्षाच्या फिटनेस आइकॉन, बेडवरच करतात एक्सरसाइज

- Advertisment -

Manini