Sunday, December 10, 2023
घरमानिनीDiary97 वर्षाच्या फिटनेस आइकॉन, बेडवरच करतात एक्सरसाइज

97 वर्षाच्या फिटनेस आइकॉन, बेडवरच करतात एक्सरसाइज

Subscribe

अमेरिकेतील इलेन लालेन या वयाच्या 97 व्या वर्षी सुद्धा फिटनेस इंडस्ट्रीच्या आदर्श ठरल्या आहेत. त्यांची सकाळची एक्सरसाइज ही नेहमीच बेडवरून खाली उतरण्यापूर्वी सुरु होते. बेडवरच त्या जॅकनाइफ करतात. बाथरुममध्ये पुश-अप केल्यानंतर त्या घरात जिममध्ये काही वेळ ट्रेडमिलवर धावतात.

इलेन असे म्हणतात की, प्रतिदिन 20 मिनिट व्यायाय त्यांच्यासाठी खुप आहे. मात्र सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट अशी की, तुम्हाला विश्वास असला पाहिजे तुम्ही ते करू शकता. याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी जखमा आणि मानसिक आव्हानांदरम्यान शारीरिक रुपात अॅक्टिव्ह ठेवले. यामुळे त्यांना आयुष्य कसे जगायचे याची मदत मिळाली.

- Advertisement -

Finding fame and fitness: Elaine LaLanne shares her story with La Jollans  for Community Center series - La Jolla Light

जवळजवळ सहा दशकांपर्यंत टेलिव्हिजन फिटनेस पर्सनेलिटी जॅक लालेन यांची पत्नी आणि बिझनेस पार्टनर सुद्धा होती, जॅकला व्यापक रूपात अमेरिकेतील आधुनिक फिटनेस आंदोलनाचे जनक मानले जाते. जॅक स्वाभाविक रुपात शोमॅन होते. इलेन यांना पडद्यामागे काम करायला आवडायचे. इलेन न केवळ टीव्ही शो च नव्हे तर फिटनेस गॅजेट्ससह देशभरातील 100 पेक्षा अधिक ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या जिमचे कामकाज ही पाहायची.

- Advertisement -

2011 मध्ये जॅक यांच्या मृत्यूनंतर आजही इलेन आपल्या परिवाराचा व्यवसाय बीफिट एंटरप्राइजेज सांभाळतात. गेल्या चार वर्षांमध्ये इलेन यांनी वाढत्या वयासह फिटनेसवर दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्याचसोबत त्या एक डॉक्युमेंट्री आणि सिनेमा ही तयार करत आहेत.


हेही वाचा- कोण आहे निधी सिवाच, जी अटी स्वीकारून झाली IAS अधिकारी

- Advertisment -

Manini