fashion Tips : तुम्ही खूप बारीक आहात का ? तर वापरा या स्टाइलचे टी-शर्ट

fashion Tips : तुम्ही खूप बारीक आहात का ? तर वापरा या स्टाइलचे टी-शर्ट

आजकाल फॅशन हा विषय खूप महत्वाचा झाला असून स्टायलिश आणि परफेक्ट दिसणं गरजेचे झाले आहे. अशातच कोणते कपडे कोणावर जास्त चांगले दिसतात या कडे आपले लक्ष जास्त असते. तसेच नवीन फॅशन ट्रेंडपासून ते बॉलीवूड अभिनेत्रींनी परिधान केलेले स्टाइलिश कपडे, त्यांना त्यांच्या बजेटनुसार खरेदी करणे किंवा पुन्हा तयार करणे आवडते. याशिवाय कोणत्याही आउटफिटमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी तुमच्या शरीराच्या प्रकारानुसार त्याची निवड करणे फार महत्वाचे आहे.

शॉट्स सोबत लूज टि-शर्ट-
तुम्ही शॉर्ट्ससह प्लेन किंवा प्रिंटेड टी-शर्ट घालू शकता. तसेच शॉर्ट्ससोबत बॉडी फिटेड टी-शर्ट देखील घालू शकता. यासोबतच तुम्ही ग्राफिक प्रिंटसह टी-शर्ट देखील स्टाईल करू शकता. शॉर्ट्ससह परिधान केलेला टी-शर्ट आपल्या शरीराचा शेप बरोबर करण्यात मदत करतो.

डेनिम जॅकेट-
डेनिम जॅकेटएक कॅज्युअल लूक देतो. परंतु आजकाल हा लूक खूप सामान्य झाला आहे. अशातच तुम्हाला डेनिम जॅकेटमध्ये अनेक डिझाइन्स आणि पॅटर्न सहज मिळतील . त्यामुळे तुम्ही जॅकेटच्या आत रंगीबेरंगी प्रिंट असलेले टी-शर्ट देखील घालू शकता. हे तुम्हाला जास्त सूट होईल.

नॉर्ट स्किनफिट टि-शर्ट-
ओव्हरसाईज टी-शर्ट्स आजकाल खूप ट्रेंडी आहेत. त्याच वेळी, विशेषत: आपण या प्रकारचे टी-शर्ट नॉर्ट स्टाईलमध्ये घालू शकता. याशिवाय, जर तुम्हाला कूल लुक मिळवायचा असेल, तर तुम्ही नॉट स्टाइल ओव्हरसाइज टी-शर्टसह बॅगी जीन्सही घालू शकता. यामुळे बॉडीचा शेप उठून दिसेल.

प्रिंटेड शर्ट्स किंवा टिशर्ट्स-
जर तुम्हाला स्कर्ट घालण्याची आवड असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही शॉर्ट किंवा लाँग स्कर्टसोबत टी-शर्ट स्टाईल करू शकता . जर तुम्ही त्या वेळी बारीक दिसत असाल तर तुम्ही डेनिम किंवा लेदर फॅब्रिकपासून बनविलेले स्कर्ट देखील निवडू शकता. याशिवाय, जर तुम्हाला समर वाइब लूक कॅरी करायचा असेल, तर तुम्ही टी-शर्टला फ्लोरल किंवा फ्रिल स्टाइल स्कर्टसोबतही स्टाइल करू शकता. यामुळे बॉडीचे स्ट्रक्चर सुधारू शकते. आणि तुम्ही जास्त बारीक देखील वाटणार नाही.


हेही वाचा :  Ripped जीन्स कशी धुवायची

First Published on: May 23, 2023 3:12 PM
Exit mobile version