Wednesday, May 8, 2024
घरमानिनीFashionDopamine Dressing : डोपामाइन ड्रेसिंग फॅशनचा ट्रेंड, असा करा फॉलो

Dopamine Dressing : डोपामाइन ड्रेसिंग फॅशनचा ट्रेंड, असा करा फॉलो

Subscribe

फॅशन आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची असते. आपण काय कपडे परिधान करतो ते तुमच्यासाठी महत्वाचे असते. जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशन येतात. बहुतेक लोक त्याच प्रकारचे कपडे किंवा फॅशन ट्रेंड फॅालो करणं पसंत करतात. फॅशन म्हणजे केवळ कपडे घालणे नाही तर तुमचे व्यक्तिमत्व अधिक चांगल्या प्रकारे बनवणे. म्हणजेच तुम्ही कसे कपडे घालता. त्यासोबतच तुम्ही कोणता मेकअप करता कोणते दागिने घालता यावर अवलंबून आहे.

आजच्या काळात फॅशन इंडस्ट्रीचा ट्रेंड खूप जास्त आहे. तुम्हाला सोशल मीडियावर फॅशनसाठी प्रसिद्ध असलेले अनेक जण माहित असतील, तसेच इंस्टाग्राम आणि पिंटरेस्ट सारख्या अॅप्सद्वारे लोक त्यांचे कपडे परिधान करायला शिकतात.
दरवर्षी नवे फॅशन ट्रेंड व्हायरल होतात. तुम्हाला डोपामाइन ड्रेसिंगबद्दल माहित आहे का? केवळ अभिनेतेच नाही तर अनेक कॅालेजचे विद्यार्थी यांनाही ही फॅशन करायला आवडते. डोपामाइमन ड्रेसिंग ट्रेंड काय आहे हे जाणून घेऊया.

- Advertisement -

डोपामाइन ड्रेसिंग म्हणजे काय?
डोपामाइन हा आपल्या शरीरातील हार्मोन आहे. याला आनंद संप्रेरक म्हणतात कारण जेव्हा आपण आनंद असतो तेव्हा आपल्या मेंदूत डोपामाइन सोडले जाते ज्यामुळे तुमचा आणि समोरच्या व्यक्तीचा मूड सुधारतो.

डोपामाइन देखील फॅशनसारखे आहे. याचा अर्थ असा की तुम्ही कोणतेही आणि कोणत्याही रंगाचे कपडे परिधान केले तरी ते तुमच्या मूडवर परिणाम करतात. हे फक्त चांगले दिसण्याबद्दल नाही तर चांगले वाटणे देखील आहे. जे कपडे तुम्हाला छान दिसतात आणि आनंदही देतात.

- Advertisement -

डोपामाइन ड्रेसिंगची फॅशन कशी करायची?

  1. सर्वप्रथम एक यादी तयार करा ज्यामध्ये तुम्हाला चांगले वाटणारे रंग, तुमच्यावर चांगले दिसणारे रंग याचा समावेश करा. लाल, केशरी आणि गुलाबी अशा फुललेल्या रंगांचे कपडे घालावेत. तुम्ही असे रंग निवडले पाहिजेत जे घातल्यानंतर तुम्हाला चांगले आणि उत्साही वाटेल.
  2. तुम्हाला कोणत्या प्रकारचे फॅब्रिक कपडे आवडतात याचा विचार करा, जे तुमच्या रंगाला चांगले दिसतील. आणि तुम्हाला पाहिल्यावर समोरच्या व्यक्तीलाही चांगले दिसतील.
  3. तुमच्या स्टाइलमध्ये काही दागिने किंवा अॅक्सेसरीज समाविष्ट करा. जे तुम्ही परिधान केलेल्या कपड्यांशी जुळतील. अशावेळी तुम्ही बोल्ड ॲक्सेसरीज घालू शकता. छान लुक देणारी हँडबॅग कॅरी करा. जे तुमच्या आउटफिटला शोभेल.
  4. तुमचे कपडे निवडताना आकर्षक प्रिंट्स आणि पॅटर्न निवडा. असे कपडे परिधान करा ज्याने तुम्हाला आत्मविश्वास वाटेल. अशाच ट्रेंडी प्रिंट्स आणि पॅटर्न प्रकारचे कपडे बाजारात उपलब्ध असतात.
  5. लक्षात ठेवा की डोपामाइन ड्रेसिंग किंवा डोपामाइन फॅशन म्हणजे तुम्ही जे काही घालता त्यात चांगले आणि कॉन्फिडन्ट वाटते. जे कपडे घालण्यास तुम्हाला आरामदायक वाटत असेल तेच कपडे निवडा.
- Advertisment -

Manini