Thursday, May 16, 2024
घरमानिनीFashionबॅकलेस ब्लाऊजच्या परफेक्ट फिटिंगसाठी टिप्स

बॅकलेस ब्लाऊजच्या परफेक्ट फिटिंगसाठी टिप्स

Subscribe

आजकाल बॅकलेस ब्लाऊजचा ट्रेंड सुरु आहे. अनेक मुली-महिला या स्टायलिश दिसण्यासाठी बॅकलेस ब्लाउज डिझाईनची निवड करतात. पण, असे असले तरी अनेक जणींची फिटिंगच्या बाबतीत तक्रार असते. त्यामुळेच बॅकलेस ब्लाऊज शिवताना परफेक्ट फिटिंग असणे गरजेचे आहे. याचसंदर्भातील काही टिप्स आपण जाणून घेणार आहोत.

बॅकलेस ब्लाऊजचे पडणारे खांदे कसे दुरुस्त करायचे?

- Advertisement -

बॅकलेस घालणाऱ्या अनेक महिलांची तक्रार असते की, ब्लाऊजचे खांदे हे पडतात किंवा लूझ तरी होतात. योग्य फिटिंग न झाल्यामुळे अनेक महिला टेलरला दोष देतात. मात्र, दर वेळेला टेलरचीच चूक असेल असे नाही. कारण तुमच्या बॉडीशेपमुळे सुद्धा असे कधीकधी होऊ शकते. यासाठी तुम्ही बॅकलेस ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये डिझायनर दोरी लावू शकता. डिझायनर दोरीमुळे तुमचे पडणारे खांदे एका जागी स्थिर राहतील. शिवाय तुमच्या ब्लाऊजला रिच लूक सुद्धा मिळेल.

- Advertisement -

बॅकलेस ब्लाउज स्टिचिंग टिप्स –
बॅकलेस ब्लाउज हा सिम्पल सुद्धा छान दिसतो. पण जर तुम्हाला त्याला स्टायलिश लूक दयायचा असेल तर तुम्ही त्याला लेस देखील लावू शकता. याशिवाय मोती किंवा मणी सुद्धा वापरू शकता. हवे असल्यास ब्लाऊजच्या दोरीला हेवी लटकन सुद्धा लावू शकता. तुमचा साडी लूक पूर्ण करण्यासाठी साडीला मॅच होतील असे दागिने त्यावर घालू शकता.

ब्लाउज स्टाईल करा करायचा?

अनेकजणी आवड असूनही बॅकलेस ब्लाऊज घालत नाही. कारण ‘ब्रा’चा पट्टा दिसेल. हे टाळण्यासाठी तुम्ही बॅकलेस ब्लाऊजला पॅड लावू शकता. पण पॅड निवडताना योग्य काळजी घ्या. कारण योग्य साईझचे पॅड न निवडल्यास ब्लाउजची फिटिंग तुम्हाला नीट बसणार नाही.

 

 


हेही वाचा ; स्टायलिस्ट दिसायचयं, मग वापरा या टिप्स

 

- Advertisment -

Manini