Monday, September 25, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Fashion डीप नेक ब्लाउजमध्ये कंम्फर्टेबल राहण्यासाठी 'या' टीप्स वापरा

डीप नेक ब्लाउजमध्ये कंम्फर्टेबल राहण्यासाठी ‘या’ टीप्स वापरा

Subscribe

साडी असो किंवा लहंगा ऐवढेच नव्हे शरारासोबत तुम्ही ब्लाउज हमखास घालता. यामध्ये काही डिजाइन किंवा पॅटर्न अगदी सहज मिळतात. यामध्ये तुम्हाला रेडीमेड वेरायटी सुद्धा पहायला मिळतात. सध्या डीप नेक ब्लाउजचा ट्रेंन्ड फॉलो केला जात आहे. मात्र ते कॅरी करताना आपण कंम्फर्टेबल असणे अत्यंत गरजेचे असते. अशातच जर तुम्हाला डीप नेक ब्लाउजमध्ये अनकंम्फर्टेबल वाटत असेल तर पुढील काही टीप्स नक्कीच तुमच्या कामी येतील.

ट्युब स्टाइल ब्लाउज कसे कराल स्टाइल?

- Advertisement -


ट्युब ब्लाउजमध्ये स्लीव्स नसतात आणि अशाप्रकारचे ब्लाउज एकाच ठिकाणी अधिक वेळ टिकून राहत नाहीत. याला दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही बूब टेपचा वापर करू शकता. याच्या आतमध्ये तुम्ही स्ट्रॅपलेस ब्रा घालू शकता. यासाठी फिटिंग असणारी ब्रा खरेदी करा. जेणेकरुन ब्लाउजची फिटिंग व्यवस्थितीत होईल.

प्लंजिंग नेकलाइन अशी करा स्टाइल

- Advertisement -

अपने प्लंजिंग नेकलाइन ब्लाउज को आकर्षक बनाने के 8 तरीके | दुल्हन का पहनावा  | विवाह ब्लॉग
आजकाल प्लंजिंग नेकलाइन खुप पसंद केले जातात. मात्र अशा प्रकारचे डीप नेक घालणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. कारण ते अत्यंत काळजीपूर्वक कॅरी करावे लागतात. यासाठी तुम्ही ब्लाउजच्या आतमध्ये कप्स फिट करू शकता. असे केल्याने ब्रा न घातल्यास तरीही चालेल.

बॅकलेस ब्लाउज असा करा स्टाइल


आजकाल नेक लाइमध्ये बॅक लेस डिझाइन फार ट्रेंन्डमध्ये आहे. यामुळे आतमधील ब्रा दिसून येऊ शकते. अशातच तुम्ही बूब टेप किंवा कप्सचा वापर करू शकता. तर कप्ससाठी आपल्या ब्रेस्ट साइजची काळजी घ्या आणि माप घेऊनच कप खरेदी करा.


हेही वाचा- वर्किंग वुमेन्ससाठी ‘या’ ब्लॉऊज डिझाइन्स आहेत Perfect

- Advertisment -

Manini