जेवणामध्ये विशेष चव वाढवण्यासाठी हिंगचा स्वाद खूप महत्वाचा असतो. मात्र, हिंग केवळ जेवणाची चवचं नाही तर आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे.
हिंग आरोग्यासाठी फायदेशीर
- छातीत कफ झाला असल्यास हिंग पाण्यात घोळून त्याचा लेप तयार करुन छातीला लावावा. यामुळे कफ विरघळण्यास मदत होते.
- उचकी थांबत नसल्यास हिंग खाणे फायदेशीर ठरते. हिंगाचे सेवन केल्याने उचकी त्वरीत थांबण्यास मदत होते.
- ढेकर किंवा मळमळ होत असल्यास केळे कुसकरुन त्यात चिमूटभर हिंग टाकून त्या केळ्याचे सेवन करावे. त्यामुळे मळमळ थांबण्यास मदत होते.
- पोटात दुखत असल्यास चिमूटभर हिंग घेऊन ते पाण्यात मिसळून प्यावे. त्यामुळे पोटदुखी थांबते. तसेच हिंग पाण्यात भिजवून ते पोटाला लावल्याने आराम मिळतो.
- Advertisement -
- पोटात गॅस झाला असल्यास हिंग सर्वात स्वस्त आणि मस्त उपाय आहे. ताकामध्ये हिंग मिसळून ताक प्यावे. त्यामुळे गॅसपासून आराम मिळतो. त्याचप्रमाणे अजीर्ण झाल्यास चूर्णाचे सेवन करावे. त्याने पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत होते.
- त्वचेसंबंधित तक्रार असल्यास हिंग हा उत्तम पर्याय आहे. पायाला भेगा पडल्या असल्यास कडुलिंबाच्या तेलात हिंग मिसळवून त्याचा लेप पायाला लावल्यास भेगा भरुन निघण्यास मदत होते.
- तसेच डाग किंवा इतर त्वचेसंबंधित तक्रारी असल्यास पाण्यात हिंग मिसळून त्या जागेवर लावाल्यास डाग जाण्यास मदत होते.
- दात दुखत असल्यास पाण्यामध्ये हिंग मिक्स करून त्या पाण्याच्या गुळण्या केल्यास दातदुखी थांबते.
- Advertisement -
हेही वाचा :