Thursday, May 2, 2024
घरमानिनीHealthकॉलेस्ट्रॉलवर हिंगाचे पाणी फायदेशीर

कॉलेस्ट्रॉलवर हिंगाचे पाणी फायदेशीर

Subscribe

भारतीय मसाल्यांमध्ये असणारा पदार्थ म्हणजे हिंग. हिंग आपण अनेक पदार्थांमध्ये वापरतो. हिंग केवळ पदार्थांची चवच वाढवित नाही तर आरोग्य फायदे देखील प्रदान करतो. हिंग त्याच्या विशिष्ट सुगंधासाठी ओळखण्यात येतो. हिंगच नाही तर हिंगाचे पाणी सुद्धा आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. जाणून घेऊयात रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी पिण्याचे फायदे,

खराब कोलेस्ट्रॉल कमी करते –
हिंगामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. हाय लेव्हल कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग आणि स्ट्रोक सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत हिंगाचे पाणी रिकाम्या पोटी नियमित प्यायलास एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते.

- Advertisement -

वजन कमी करण्यास फायदेशीर –
कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी करण्यासाठी तुमचे वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे असते. अशा परिस्थितीत हिंगाचे पाणी वजन कमी करण्यास तुम्हला उपयोगी पडेल. हे मेटॅबॉलिझम वाढवून चरबी कमी करण्यास मदत करते. याशिवाय हिंगाच्या पाण्याच्या सेवनाने पोट भरलेले राहते. भूक कमी लागते.

- Advertisement -

अँटीऑक्सीडेंटने समृद्ध –
हिंगात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात. हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करतात. ज्यामुळे पेशींचे नुकसान होऊ शकते. परिणामी, हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता निर्मण होते. निरोगी आयुष्यासाठी कोलेस्ट्रॉलचे रुग्ण हिंगाचे पाणी पिऊ शकतात.

पचनास फायद्याचे –
पचनक्रिया सुधारण्यासाठी अनेक जण हिंगाचे सेवन करतात. पाचक एन्झाईम्सचे उत्पादन हिंग वाढवते. ज्याने निरोगी पचन होते. हिंगाच्या पाण्याच्या सेवनाने सूज आणि अपचनसारख्या समस्या टाळता येऊ शकतात.

विरोधी दाहक गुणधर्म –
हिंगात विरोधी दाहक गुणधर्म असतात. ज्याने शरीरातील दाह कमी होण्यास मदत मिळते. हाय कोलेस्ट्रॉलमुळे बहुतेकदा जळजळ जाणवते. ज्यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता असते. अशा परिस्थिती हिंगाचे पाणी फायदेशीर ठरते.

 

 


हेही वाचा : सावधान! दूध किंवा ज्यूससोबत औषधं घेणं आरोग्यासाठी घातक

- Advertisment -

Manini