Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthबीपी आणि कॅन्सरसारख्या आजारांपासून होईल सुटका, फक्त करा 'ही' योगासने

बीपी आणि कॅन्सरसारख्या आजारांपासून होईल सुटका, फक्त करा ‘ही’ योगासने

Subscribe

कोरोना काळापासून उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग यासारखे आजार वाढत जात आहेत. विशेष म्हणजे हे आजार लहान वयात होताना दिसत आहे. या आजारापासून वाचण्यासाठी कोणती सोपी योगा आणि प्राणायाम आहेत, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सूर्यनमस्कारामुळे वजय नियंत्रित राहते

सूर्यनमस्कारामुळे तुमची चयापचय सुधारण्यास मदत होते आणि अन्नातून कॅलरीज घेण्याची आणि उर्जेमध्ये रुपांतर करण्याची प्रक्रिया सुधारते. तुम्ही जेव्हा कपालभाती आणि भस्त्रिका प्राणायामाने शरीरात ऊर्जा वापरली जाते. यामुळे तुमचे पचनक्रिया आणि वजन संतुलित राहते.

- Advertisement -

भुजंगासन हृदयाच्या स्नायूंना बळकट करते

भुजंगासन आणि सेतुबंधासन हृदयाचे स्नायू बळकट करतात. या आसनामुळे रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते. या आसनामुळे पाठ, फुप्फुसे, खांदे, छाती आणि पोटाच्या खालच्या लवचिकता प्रदान करते. यामुळे विलोम प्राणायाम केल्याने फुप्फुसांची क्षमता वाढते आणि हृदयही बरे होते. रक्त आणि शरीराच्या सर्व अवयवांना पुरेसे ऑक्सिजन पोहोचण्यास मदत करते.

- Advertisement -

ताडासनामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते

ताडासन आणि त्रिकोनासन यासारख्या आसनामुळे ऊर्जा पातळी सुधारते आणि तुमचे शरीर लवचिकता वाढते. यामुळे चिंता आणि तणावापासून आराम मिळण्यास मदत होते आणि मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत होता. दीर्घ श्वासोच्छवासाच्या व्यायाम उज्जावी प्राणायाम चिंता कमी करते.

कोनासन स्वादुपिंड सक्रिय करण्यास मदत करते

कोनासन आणि पश्चिमोत्तानासनाचा नियमित सराव करतो. तुमचे स्वादुपिंड सक्रिय करण्यास मदत करत असून यामुळे इंसुलिनचे उत्पादन आणि रक्तामधील साखरेचे नियम करण्यास मदत करते. कपालभाती हे स्थितीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

शवासनाने मन आणि शरीर दोन्हीला आराम मिळतो

शवासनने शरीर आणि मन दोन्हीला आराम मिळतो. यामुळे तणाव आणि चिंता कमी करतात. या प्राणायामुळे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकतो. हा दीर्घ उच्छवास प्राणायाम आहे. यामुळे तुमची रक्तदाब पातळी संतुलित करण्यास मदत करते.

धनुर्वक्रासनाने रक्तप्रवाह सुधारून किडनी मजबूत करते

धनुर्वक्रसन अर्धमत्स्येंद्रासनमुळे तुमचे रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते आणि जळजळ कमी करून मूत्रमिंडाचे कार्य वाढवते. या योगासनांमुळे मूत्रपिंडाचे कार्य अधिक प्रभावी होण्यास मदत करते.


हेही वाचा – International Yoga Day 2023 : वजन कमी करायचंय? ‘ही’ 5 योगासने करतील मदत

- Advertisment -

Manini