घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रडी. फार्मसी प्रवेश इच्छुकांना दिलासा; नोंदणीस ३ जुलैपर्यंत मुदतवाढ

डी. फार्मसी प्रवेश इच्छुकांना दिलासा; नोंदणीस ३ जुलैपर्यंत मुदतवाढ

Subscribe

नाशिक : बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रम डी.फार्मसी प्रवेश नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. या प्रवेशप्रक्रियेला ३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाने गुणवत्तायादी प्रसिद्धी करण्यापर्यंतचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रम डी. फार्मसीमध्ये शैक्षणिक २०२३-२४ च्या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया १२ जूनपासून सुरू झालेली आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ३ जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे. या मुदतीत विद्यार्थ्यांनी ई-स्क्रुटिनी किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनीची पद्धतीची निवड करून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे. सध्याच्या वेळापत्रकानुसार ५ जुलैला तात्पुरती गुणवत्तायादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

- Advertisement -

या यादीशी निगडित तक्रारी, हरकती नोंदविण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदत दिली जाईल. यानंतर ११ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. याआधारे विद्यार्थ्यांना प्रवेश फेर्‍यांमध्ये सहभागी होता येईल. महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविण्याचे प्रवेशफेरीनिहाय वेळापत्रक आगामी काळात प्रसिद्ध केले जाणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी ३ जुलैपर्यंत मुदत असेल. अंतिम गुणवत्तायादी प्रसिद्धी झाल्यानंतर जुलैच्या दुसर्‍या आठवड्यापासून प्रवेश फेरीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.

डिप्लोमा अर्जांसाठी ३० पर्यंत मुदतवाढ

दहावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण शाखेतील विद्यार्थ्यांसाठी तंत्रनिकेतन येथे उपलब्ध असलेल्या पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम प्रवेशाला मुदतवाढ दिलेली आहे. त्यानुसार आता पात्र विद्यार्थी येत्या ३० जूनपर्यंत नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. या वाढीव मुदतीत विद्यार्थ्यांनी नोंदणी करून ई-स्क्रुटिनी किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनीचा पर्याय निवडून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे. प्रक्रियेच्या पुढील टप्यात ३ जुलैला प्रारूप गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. ४ व ५ जुलैदरम्यान हरकती, तक्रार नोंदविण्याची मुदत असेल. ७ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -