Monday, May 6, 2024
घरमानिनीHealthमाईंड डिटॉक्ससाठी करा या मुद्रा

माईंड डिटॉक्ससाठी करा या मुद्रा

Subscribe

धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये मानवाच्या आयुष्यातील शांतता जणू काही गायब झाली आहे. त्यामुळे अनेकजणांना नैराश्य, चिंता, स्ट्रेस यासारख्या समस्या जाणवत आहेत. आपल्या शरीराला शारीरिक समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी जशी बॉडी डिटॉक्सची गरज असते त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्यासाठी माईंड डिटॉक्सची गरज असते. अशावेळी तुम्हाला काही मुद्रा करणे उपयुक्त ठरू शकते.

ज्ञान मुद्रा –

- Advertisement -

ज्ञान मुद्रा करण्याचे फायदे – ज्ञान मुद्रा केल्याने अशांत मन शांत होते. मनात जी काही नकारात्मक भावना असते ती दूर होते. संयम, एकाग्रता, स्मरणशक्ती वाढविण्यास ही मुद्रा फायदेशीर ठरते. तुम्हाला जर निद्रानाशेचा त्रास असेल तर ज्ञान मुद्रा अवश्य करा. राग ,चिडचिड आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी ज्ञान मुद्रा खूप फायदेशीर ठरते. याशिवाय तुम्हाला जर धुम्रपानापासून तुम्हाला सुटका हवी असेल तर ज्ञान मुद्रेचा सराव अवश्य करावा.

- Advertisement -

ज्ञान मुद्रा करण्याची पद्धत –

  • ज्ञान मुद्रा करण्यासाठी सर्वप्रथम सुखासनात बसावे.
  • ज्ञान मुद्रा करताना कंबर आणि मान सरळ ठेवा.
  • मनगट तुमच्या गुडघ्यावर ठेवा.
  • दोन्ही हातांच्या तर्जनची टोके वाकवून त्यांना अंगठ्याने जोडा.
  • उरलेली तीन बोटे सरळ ठेवा आणि त्यांना एकत्र जोडा.
  • आता डोळे मिटून स्थितीत बसून राहा.
  • दीर्घ आणि खोल श्वास घ्या, श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा.
  • 15 ते 30 मिनिटे या मुद्राचा सराव करा.

अपान मुद्रा –

अपान मुद्रा करण्याचे फायदे – अपान मुद्रा केल्याने मेंदू पूर्णपणे डिटॉक्स होतो. याशिवाय तुम्ही भावनिकदृष्ट्या निरोगी राहता. तणाव, स्ट्रेस, आणि डिप्रेशन यासारख्या समस्या जाणवत नाही.

 

अपान मुद्रा करण्याची पद्धत –

  • अपान मुद्रा करण्यासाठी सर्वप्रथम सुखासनात बसावे.
  • यानंतर तळवे गुडघ्यांच्यावर उघडे ठेवा.
  • आता तर्जनी वाकवून अंगठ्याच्या टोकावर ठेवा.
  • यानंतर, अंगठयाच्या टोकाला मधल्या आणि रिंग फिंगरने बोटाना स्पर्श करा.
  • यादरम्यान, हाताची करंगळी बाहेरच्या दिशेने वाढवावी.
  • ही मुद्रा करताना डोळे मिटून दीर्घ श्वास घ्या.
  • मुद्रा करता असताना तुमचे संपूर्ण लक्ष केवळ तुमच्या श्वासावर असायला हवे.
  • याशिवाय मुद्रा करताना तुमचा पाठीचा कणा आणि कंबर पूर्णपणे सरळ असावी हे लक्षात घ्या.
  • 15 मिनिटे या स्थितीतच राहा.

 

 

 


हेही वाचा : सायकल चालविण्याचे आश्चर्यकारक फायदे

 

- Advertisment -

Manini