Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthसायकल चालविण्याचे आश्चर्यकारक फायदे

सायकल चालविण्याचे आश्चर्यकारक फायदे

Subscribe

शरीराला फिट ठेवण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे सायकलिंग. जर तुम्ही तासनतास बसून काम करणारे असाल तर शारीरिक हालचालींसाठी 15 मिनिटे सायकल चालवा. सायकल चालविल्याने अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो. यामुळे वजन कमी होते, स्ट्रेस कमी होतो. एकूणच तुमचा फिटनेस सुधारण्यासाठी सायकल चालविणे उपयुक्त ठरते. यामुळे हृदय, फुफ्फुसे, रक्तवाहिन्या, नसा सर्व निरोगी राहतात आणि त्यांचे कार्य सुरळीतपणे पडतात.

महिलांसाठी सायकलिंगचे फायदे –

- Advertisement -

सायकलिंग करून एनर्जी वाढवा –
एका संशोधनानुसार, महिलांनी सायकल चालवायला हवी कारण ती एनर्जी बुस्टरचे काम करते. सायकल चालविल्याने शरीराला एनर्जी मिळते. याच्या मदतीने तुम्ही न थकता दिवसभराचे काम करू शकता, तंदुरुस्त आणि सक्रिय राहू शकता. सायकलिंग केल्याने मेंदूमध्ये नुरोट्रांसमीटर डोपामाईन तयार होतो, जो एनर्जीशी संबंधित असतो.

सांधेदुखीपासून होतो बचाव –
वाढत्या वयाबरोबर हाडांशी संबंधित समस्या उदभवतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअमची कमतरता असते, ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास जाणवतो. सायकल चालविणे धावणे अथवा फेरफटका मारण्यापेक्षा गुडघे किंवा मणक्यावरील स्ट्रेस कमी करू शकते.

- Advertisement -

मसल्स मजबूत होतात –
सायकल चालविल्याने पायांचे स्नायू मजबूत होतात. हिप आणि गुडघ्यांच्या सांध्यच्या गतिशीलतेसाठी सायकलींग उत्तम व्यायाम आहे. ही शारीरिक क्रिया अनियमितपणे केल्याने पाय, मांड्या आणि नितम्ब यांच्या मसल्सचा टोन सुधारण्यास मदत होईल.

कॅलरीज बर्न होतात –
शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी करण्यासाठी सायकलिंग हा उत्तम मार्ग आहे. अनेकदा महिलांना वाढते वजन, फुगलेले पोट आणि रुंद कंबर याचा त्रास होतो. सायकल चालविल्याने प्रतितास सुमारे 300 कॅलरीज बर्न होतात.

हार्टचे आरोग्य राखते –
हार्ट प्रोब्लेमने ग्रस्त असलेल्या महिलांचा समावेश असलेल्या एक अभ्यासात असे दिसून आले आहे की, आठवड्यातून तीन वेळा सुमारे अर्धा तास सायकलिंग केल्याने वर्षभरानंतर त्यांच्या मेडिकल टेस्टमध्ये ब्लड प्रेशर आणि LDL कोलेस्ट्रॉल लक्षणीयरीत्या कमी होते.

प्रेगन्सीमध्ये सायकलिंग करण्याचे फायदे –
प्रेग्नीसीमध्ये नियमित सायकल चालवणे हा एक उत्कृष्ट एक्ससारसाईझ आहे. कारण यामुळे हार्ट निरोगी राहते. मात्र, प्रेग्नसीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच सायकलींग करावी.

 

 

 


हेही वाचा : Health Care : जमिनीवर झोपल्याने होतील ‘हे’ आजार दूर

- Advertisment -

Manini