स्ट्रेस आणि डिप्रेशन नको, मग आजच फॉलो करा ‘या’ टिप्स

स्ट्रेस आणि डिप्रेशन नको, मग आजच फॉलो करा ‘या’ टिप्स

कामाच्या अतिताणामुळे ‘स्ट्रेस’ हा जीवनाचा आता भाग बनत चालला आहे. ‘स्ट्रेस’ आणि ‘डिप्रेशन’मुळे अनेकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच ‘स्ट्रेस’ आणि ‘डिप्रेशन’चा आपल्या वागण्या बोलण्यावरही परिणाम होत आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास व्यक्ती नेहमी उदास, अस्वस्थ, चिडचिडी आणि रागावलेली दिसत असेल. आजकालच्या बिझी लाइफस्टाइलमुळे स्ट्रेस आणि डिप्रेशन हे सामान्य झाले आहे. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक अशा प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अनेक जण मानसिक आजारांना बळी पडत आहेत. मात्र, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेऊन काम केल्यास स्वतःला ‘स्ट्रेस’ आणि ‘डिप्रेशन’पासून दूर ठेवता येऊ शकते.

‘स्ट्रेस’ आणि ‘डिप्रेशन’ नको असेल तर खालील उपाय फॉलो करा –

1. स्ट्रेस नियंत्रित केला पाहिजे. त्यामुळे अनेक गंभीर आजार टाळता येतील.
2. तुम्ही तुमचे विचार नेहमी सकारात्मक ठेवावे. याच्या मदतीने स्ट्रेसचे व्यवस्थापन सहज करता येईल.
3. अतिविचार करणे टाळले पाहिजे.
4. स्ट्रेस निर्माण झालेल्या वातावरणात आक्रमक होण्याऐवजी नेहमी संयम राखला पाहिजे.
5. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे.
6. वेळेचा योग्य वापर केला पाहिजे. यामुळे तुम्ही व्यस्त राहाल आणि स्ट्रेस निर्माण होणार नाही.
7. सर्वात जास्त स्ट्रेस निर्माण करणाऱ्या गोष्टी ओळखा आणि त्या टाळण्याचा प्रयन्त करा.
8. स्ट्रेस कमी करण्यासाठी अल्कोहोल, ड्रग्ज किंवा मादक पदार्थ टाळा.
9. तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि कुटुंबासोबत पुरेसा वेळ घालवा. त्यामुळे स्ट्रेस आणि डिप्रेशनला सहज दूर ठेवता येते.
10. स्ट्रेस आणि डिप्रेशन कमी होत नसल्यास, मानसशास्त्रज्ञाकडे जा. ते तुमच्या समस्या सोडविण्यास मदत करू शकतील.

 


हेही वाचा ; ‘या’ टिप्सने ‘पीरियड क्रॅम्पपासून’ मिळेल आराम

First Published on: December 26, 2023 11:05 AM
Exit mobile version