Thursday, May 9, 2024
घरमानिनीHealthहार्मोन्स balance राहण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा..

हार्मोन्स balance राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा..

Subscribe

शरीरातल्या हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच हार्मोन्स संतुलित राहणे खूप महत्वाचे आहे. हार्मोन्समध्ये थोडासाही चढ-उतार झाल्यास शरीरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. जसे की अनियमित मासिक पाळी, थायरॉईड, पीसीओडी, तणाव, प्रजनन क्षमता संबंधित तक्रारी. जर तुम्हालाही स्वतःमध्ये असे काही बदल जाणवत असतील किंवा तुम्हाला तणावासारख्या तक्रारी येत असतील, तर तुम्ही तज्ञांनी दिलेल्या या टिप्स फॉलो करू शकता. ज्यामुळे हार्मोन्स निरोगी राहतील…

Hormonal Imbalance Treatment for Weight Loss Near Me

  • आपल्या पैकी बऱ्याच जणांना उन्हात बसणे आवडत नाही.
  • यामुळे हार्मोन्सही असंतुलित होतात. तसेच यामुळे शरीराला सूर्यप्रकाश मिळत नाही.
  • त्यामुळे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा.
  • यामुळे मेंदूतील सेरोटोनिन नावाच्या संप्रेरकाचा स्राव वाढतो ज्यामुळे मूड सुधारण्यास मदत होते आणि व्यक्तीला शांतता आणि एकाग्रता मिळते.
  • जर का तुम्हाला दारू पिण्याची सवय असेल तर दारू पिणे टाळा. कारण अल्कोहोल हे शरीराच्या हार्मोन्सवर परिणाम करतात आणि परिणामी यामुळे तणाव, थायरॉईड, प्रजनन समस्या इत्यादीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
  • यासोबतच हार्मोन्स रिसेट करण्यासाठी योग्य झोप घेणे खूप महत्वाचे आहे.
  • चांगल्या झोपेमुळे लेप्टिन, घरेलीन, इन्सुलिन आणि कॉर्टिसॉल यांसारखे हार्मोन्स स्थिर राहण्यास मदत होते.
  • याशिवाय कॅफिनचेही सेवन करणे टाळावे. कॅफिनमुळे शरीरातील ग्रंथी उत्तेजित होतात ज्यामुळे शरीरात तणाव निर्माण होतो.

हेही वाचा :  शरीरासाठी पाण्याइतकेच ऊनही गरजेचे

- Advertisment -

Manini