Sunday, April 28, 2024
घरमानिनीHealthपिरीएड्स वेळेवर येत नाहीत? 'या' पदार्थाचे करा सेवन

पिरीएड्स वेळेवर येत नाहीत? ‘या’ पदार्थाचे करा सेवन

Subscribe

बऱ्याच महिलांना चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाइलमुळे पिरीएड्स वेळेवर न येण्याची समस्या जाणवत आहे. पिरीएड्स वेळेवर न येण्यामागचे कारण म्हणजे शरीरातील हार्मोनल असंतुलन. महिलांच्या शरीरातील हार्मोनल असंतुलनामुळे पिरीएड्स अनियमित न होणे, थायरॉईड, पीसीओएस, मूड बदलणे, नैराश्य येणे आदी समस्या प्रकर्षाने जाणवतात.

साधारणपणे महिलांची पिरियड सायकल 22 ते 28 असते. जर महिलांना यापेक्षा जास्त काळ पिरीएड्स येत असतील तर त्याला हार्मोनल असंतुलन असे म्हणतात. तुम्हालाही जर अशी काही समस्या जाणवत असेल तर महिलांनी तत्काळच डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे. मात्र, अनियमित पिरीएड्सची समस्या काही घरगुती उपायांनी सोडवता येते.

- Advertisement -

अशावेळी अनियमित पिरीएड्सच्या समस्येवर घरगुती उपायांमध्ये तुम्हाला शतावरीचे सेवन अत्यंत फायद्याचे ठरेल. महिलांसाठी शतावरी खाणे खूप फायदेशीर मानले जाते. याच्या सेवनाने अनियमित पिरीएड्सच्या समस्येपासून मुक्तता होऊ शकते.

शतावरी कशी घ्यायची ?

- Advertisement -

अर्धा चमचा शतावरी दिवसातून दोन वेळा खाणे सुरक्षित मानले जाते. अनियमित पिरीएड्सच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, कोमट पाण्यात शतावरी पावडर मिसळून प्यायल्याने तुमची समस्या दूर होऊ शकते. याव्यतिरिक्त तुम्ही शतावरीचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता.

 

शतावरीचे फायदे –

शतावरीमध्ये बायो एक्टिव कंपाउंड आढळतात आणि त्यात फायटोइस्ट्रोजेनचा देखील प्रभाव असतो. महिलांच्या शरीरातील हार्मोनल असंतुलनासाठी शतावरीचे सेवन खूप फायदेशीर आहे. शतावरी पीसीओएस आणि वंध्यतंत्वावर उपचार करण्यासाठी देखील वापरली जाते. स्तनपान करणाऱ्या महिलांनी शतावरी पावडर मध किंवा दुधात मिसळून प्यायल्यानेही फायदा होतो. याचे सेवन केल्याने पिरीएड्सदरम्यान, रक्तप्रवाह सामान्य रहातो आणि पोटदुखी, पेटके जाणवत नाहीत. याशिवाय झोप येण्यासही मदत होते आणि थायरॉइडची समस्या दूर करण्यासाठी शतावरीचे सेवन फायद्याचे ठरते.

 

 

 

 


हेही वाचा : एब्सेंट पिरियड्स म्हणजे काय?

 

- Advertisment -

Manini