Oral Health Of Kids : लहान मुलांच्या ओरल हेल्थसाठी वापरा ‘या’ टिप्स

Oral Health Of Kids : लहान मुलांच्या ओरल हेल्थसाठी वापरा ‘या’ टिप्स

मुलांसाठी तसेच मोठ्या माणसांसाठी तोंडाचे आरोग्य अतिशय महत्वाचे आहे. तसेच संपूर्ण आरोग्यासाठी तोंडाची स्वच्छता का आवश्यक आहे? तज्ज्ञांच्या मते, दातांच्या आजारामुळे शरीरात अनेक गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे आरोग्यासोबत दातांची स्वच्छताही महत्त्वाची आहे.

सामान्यतः मुलांमध्ये ओरल हेल्थची समस्या अधिक पाहायला मिळते. अशातच लहान मुलांना जास्त गोड खाण्याची सवय असते. अशातच लहान मुले न ब्रश करता झोपतात आणि त्यामुळे त्यांच्या दातांचे आयुष्य कमी होते. तसेच दातांना कीड पडणे,दात नाजूक होणे असे एक आणि अनेक समस्या तयार होतात.

1. मुलांनी दिवसातून दोनदा ब्रश करावे-

मुलांच्या तोंडाची आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी दिवसातून किमान दोनदा ब्रश करा. सकाळी आणि रात्री अन्न खाल्ल्यानंतर दात स्वच्छ केले आहेत का ? याची खात्री करा. अशाप्रकारे दातांमध्ये कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत.

2. खाल्ल्यानंतर दात आणि हिरड्या स्वच्छ धुवा-

असे काही पदार्थ असतात जे दातांमध्ये किंवा हिरड्यांमध्ये चिकटलेले असतात. जे दात किडण्याचे मुख्य कारण आहेत. म्हणूनच मुलांनी काही पण खाल्यांनंतर दात स्वच्छ केले आहेत का ? हे एकदा बघा.

3. जीभ साफ करणे-

तोंडाच्या आरोग्याची स्वच्छता ही केवळ दातांपुरती मर्यादित नाही. तर तोंड व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी जीभ स्वच्छ करणे देखील आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तोंडात बॅक्टेरिया पसरू नयेत म्हणून मुलांना टंग क्लीनर वापरायला शिकवा. तसेच जीभ स्वच्छ नाही झाली तर अनेक आजार देखील लगेच होतात.

4. मुलांना गोड पदार्थ खाऊ घालू नका-

लहान मुलांना अनेकदा गोड खायला आवडते. चॉकलेट, पेस्ट्री, केक वगैरे त्यांचे आवडते पदार्थ आहेत. ज्यामुळे दातांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत मुलांना या गोष्टी जास्त प्रमाणात खाऊ न देण्याचा प्रयत्न करा. जास्त गोड खाल्ल्याने दातांमध्ये पोकळी निर्माण होऊ शकते. तसेच दातांचे दुखणे वाढते.

5. डॉक्टरांचा सल्ला घ्या-

लहान मुलांच्या दातांमध्ये पोकळीची समस्या अधिक असते. अशातच जास्त गोड खाल्ल्याने त्यांचे दात खराब होऊ लागतात. अशा परिस्थितीत दर महिन्याला नियमितपणे मुलांना dental doctaors कडे घेऊन जा. त्यामुळे मुलांचे मौखिक आरोग्य बळकट होईल. तसेच दातांचे आरोग्य सुधारेल.


हेही वाचा :  तुमची मुलं झोपताना घोरतात का? पालकांनो करु नका दुर्लक्ष

First Published on: May 24, 2023 3:37 PM
Exit mobile version