पिरीएड्सदरम्यान स्विमिंग करायचंय, मग करा ही गोष्ट

पिरीएड्सदरम्यान स्विमिंग करायचंय, मग करा ही गोष्ट

एका विशिष्ट वयानंतर मुलीच्या आयुष्यात शारीरिक बदल होत तिला पिरीएड्स येऊ लागतात. यादरम्यान, महिलेला हेवी ब्लीडींग, पोटदुखी, क्रॅम्प्स अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यामुळे मुली पिरीएड्सदरम्यान, काही गोष्टी करणे टाळतात. त्यापैकी एक म्हणजे स्विमिंग. शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी स्विमिंग हा नेहमीच उत्तम व्यायाम मानला जातो. पण, पिरीएड्स सुरु असताना स्विमिंग करावे की नाही असा प्रश्न अनेक जणींच्या मनात येतो.

पिरीएड्सदरम्यान, मुलींनी जास्त ऍक्टिव्हिटी करू नये यामुळे पिरीएड्समध्ये जास्त त्रास होतो असे अनेकांचे मत असते. पण, प्रत्यक्षात तसे नसते. योग्य काळजी घेतली तर पिरियड्समध्येही स्विमिंग करणे सहज शक्य आहे. जाणून घेऊयात, अशा काही टिप्स ज्याद्वारे तुम्ही पिरीएड्सदरम्यान सहज स्विमिंग करू शकाल.

पिरीएड्सदरम्यान स्विमिंग सुरक्षित आहे का?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पिरीएड्सदरम्यान स्विमिंग करणे आरोग्यसाठी फायदेशीर ठरते. मात्र, या दिवसात तुम्हाला काही महत्वाची खबरदारी घेण्याची गरज असते. विशेषतः मुलींनी पिरीएड्सदरम्यान, स्विमिंग करताना पॅडऐवजी मेन्स्ट्रुअल कप किंवा टॅम्पॉनचा वापर करावा. मेन्स्ट्रुअल कप किंवा टॅम्पॉनचा वापर स्विमिंगसाठी पूर्णपणे सुरक्षित मानले जाते.

पिरीएड्सदरम्यान स्विमिंग करणे अनहायजेनिक आहे का?

पिरीएड्सदरम्यान स्विमिंग करताना मेन्स्ट्रुअल कप किंवा टॅम्पॉन वापरणे अनहायजेनिक नाही. स्विमिंग पूलच्या पाण्यात क्लोरीन असते ज्याने कोणत्याही संसर्ग होत नाही. त्यामुळे पिरीएड्सदरम्यान स्विमिंग करताना मेन्स्ट्रुअल कप किंवा टॅम्पॉन वापरणे अनहायजेनिक नाही.

पिरीएड्समध्ये स्विमिंग केल्याने संसर्ग होतो का?

स्विमिंग करताना कायम पाणी स्वच्छ आहे का नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. स्विमिंग करताना कायम स्वच्छ पाण्याचा वापर करा. अस्वच्छ पाण्यात स्विमिंग करणे टाळा. अस्वच्छ पाण्यात स्विमिंग करणे टाळायला हवे. असे केल्याने संसर्गाचा धोका संभवतो. याशिवाय स्विमिंगनंतर क्लोरीनचा प्रभाव दूर करण्यासाठी स्वच्छ पाण्याने अंघोळ अवश्य करावी.

स्विमिंग करण्याचे फायदे –

  1. पिरीएड्सदरम्यान स्विमिंग केल्याने शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित रहाते.
  2. पिरीएड्समध्ये जाणवणारी बॉडी पेनची समस्येवर स्विमिंग प्रभावी ठरते.
  3. स्विमिंग केल्याने पिरीएड्स क्रॅम्पपासून बराच आराम मिळतो.
  4. स्विमिंग केल्याने शरीरातील एन्डोफ्रिन नावाचे हार्मोन्स बाहेर पडतात. ज्यामुळे हृदय, मन शांत राहण्यास मदत होते.
  5. पिरीएड्सदरम्यान स्विमिंग केल्याने पोटदुखी कमी होते.

 

 

 

 


हेही वाचा : मेनोपॉजमुळे वाढू शकते ब्रेन फॉगची समस्या

 

First Published on: March 26, 2024 3:04 PM
Exit mobile version