Tuesday, December 10, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीHealthमेनोपॉजमुळे वाढू शकते ब्रेन फॉगची समस्या

मेनोपॉजमुळे वाढू शकते ब्रेन फॉगची समस्या

Subscribe

साधारणपणे 40 ते 50 वर्षांच्या दरम्यन महिलांना मेनोपॉजच्या समस्येतून जावे लागते. पिरीएड्सच्या या शेवटच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यापैकी एक म्हणजे मेनोपॉज ब्रेन फॉग. या समस्येने ग्रस्त महिलांना अनेकदा मूड स्विंग्सचा सामना करावा लागतो आणि त्यांना कोणत्याही गोष्टीवर लक्ष क्रेंद्रित करण्यास अडचणी जाणवू लागतात.

मेनोपॉजल ब्रेन फॉग म्हणजे काय ?

- Advertisement -

कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता नसणे याला ब्रेन फॉग असे म्हणतात. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यासारख्या हार्मोन्सची पातळी कमी झाल्यामुळे महिलांची समरणशक्ती कमी होऊ लागते आणि त्यांना मूड बदलण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. ही समस्या विशेषतः स्त्रियांमध्ये मेनोपॉज दरम्यान दिसून येते. महिलांच्या प्रजनन आयुष्याच्या शेवटच्या वर्षात या प्रकारचे बदल शरीरात दिसून येतात.

- Advertisement -

निरोगी आहार – मानसिक तणाव कमी करण्यासाठी आहारात ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. तसेच हिरव्या पालेभाज्या खा. याने शरीरात अँटीऑक्सीडेंट्सचे प्रमाण वाढू लागते.

झोप – एका संशोधनानुसार, दर्जेदार झोप न मिळाल्याने ब्रेन फॉगच्या समस्येचा सामना करावा लागतो. मेनोपॉजनंतरच्या 61 % महिलांना निद्रानाशाचा त्रास होतो. हे टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी जड जेवण करणे टाळा, चांगल्या झोपेसाठी कॅफिन आणि मसालेदार अन्नाचे सेवन कमी करा.

ब्रेन ऍक्टिव्हिटी – तुमची विचार करण्याची क्षमता वाढविण्यासाठी, दिवसभरात ब्रेन ऍक्टिव्हिटी करणे आवश्यक असते. यासाठी ध्यानासाठी थोडा वेळ काढा. ध्यान केल्याने मन सक्रिय आणि निरोगी राहतें, ज्यामुळे शरीरात आनंदी हार्मोन्स बाहेर पडू लागतात.

व्यायाम – नियमित व्यायाम केल्याने शरीराच्या स्नायुंमधील क्रॅम्प्स दूर होण्यास मदत होते आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत मिळते. व्यायाम केल्याने शरीरात आनंदी हार्मोन्स रिलीज होऊ लागतात. ज्यामुळे शरीर सक्रिय राहते, जॉगिंग, वॉटर एरोबिक्स आणि सायकलींग यासाठी दररोज थोडा वेळ अवश्य काढा.

 

 

 

 


हेही वाचा : पायातील नसा ब्लॉक झाल्याची ही आहेत लक्षणे आणि कारणे

 

- Advertisment -

Manini