Thursday, May 9, 2024
घरमानिनीHealthलहान मुलांमधील लठ्ठपणा म्हणजे आजारांना आमंत्रण

लहान मुलांमधील लठ्ठपणा म्हणजे आजारांना आमंत्रण

Subscribe

आजकाल लहान मुलांमध्ये लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या बनली आहे. ज्याच्या परिणाम म्हणजे अनेक मोठ्या आजारांना निमंत्रण. खाण्याच्या चुकीच्या सवयी, जास्त स्क्रीन टाइम, बैठी जीवनशैली लहानमुलांच्या लठ्ठपणाला कारणीभूत ठरत आहे. देशातही लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. 2006 पासून 2020 पर्यत 1.6 % वरून 3.8 % पर्यंत वाढली आहे. आज देशातील 14.4 % दशलक्षांहून अधिक लहान मुले लठ्ठपणाला बळी पडली आहेत.

बालपणातील लठ्ठपणाचा प्रभाव –

- Advertisement -

शारीरिक स्वास्थ्य बिघडते –
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बालपणातील लठ्ठपणामुळे टाइप 2 डायबिटीस, हायब्लडप्रेशर, हार्ट प्रॉब्लेम आणि कॅन्सरचा धोका निर्माण होतो.

मानसिक स्वास्थ बिघडते –
मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावरही लठ्ठपणाचा परिणाम होतो. ज्याने मुलांमध्ये नैराश्य आणि एकाकीपणाची भावना निर्माण होते.

- Advertisement -

अभ्यासावरही होतो परिणाम –
लठ्ठपणामुळे निर्माण होणारा मानसिक ताण आणि खराब शारीरिक आरोग्य यांचाही मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो.

मुलांना द्या संतुलित आहार –

फळे, भाज्या, धान्ये यासारखे संतुलित आहार मुलांना द्यायला हवा. एका संशोधनानुसार, लठ्ठ मुलांना व्हिटॅमिन डी सम्प्लिमेंट्स देऊन वजन कमी करता येऊ शकते. याने भविष्यात उदभवणारे हार्ट प्रॉब्लेम आणि मेटॅबॉलिझम विकारांचा धोका कमी करता येतो. यासह मुलांच्या आहारात डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही बदल करू शकता.

मुलांच्या ॲक्टिव्हिटीकडे लक्ष द्या –

मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी त्याच्या ॲक्टिव्हिटीकडे अवश्य लक्ष द्या. मुलांच्या ॲक्टिव्हिटी कॅलरीज बर्न करण्यासाठी उपयोगी ठरतील.

झोप –

झोप हा देखील मुलांच्या विकासाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. मुलांची झोप पूर्ण न झाल्यास हार्मोनल असंतुलन आणि भूक नियंत्रणावर परिणाम होऊन वजन वाढण्यास कारणीभूत ठरते.

स्क्रीन टाइम –

टीव्ही, कॉम्पुटर, स्मार्टफोन यांमुळे मुले तासनतास एकाच जागी बसून राहतात. मुलांच्या या सवयीमुळे मुले लठ्ठपणाचे शिकार बनतात.

लठ्ठपणा टाळण्यासाठी मुलांना लावा योग्य सवयी –

मुलांना तुमच्यासोबत जेवण करायला लावा. मुले कुटुंबासोबत जेवल्याने मुलांना खाण्याच्या चांगल्या सवयी लागतात. यासह मुलांना खेळ, डान्स, स्विमिंग, सायकलिंग यासारख्या गोष्टी करायला मुलांना प्रोत्साहित करा. शक्य तितके पौष्टिक आहार मुलांना द्या.

 

 


हेही वाचा : लहान मुलं तोंडात बोट का घालतात? ‘ही’ आहेत कारणं

- Advertisment -

Manini