Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthलहान मुलं तोंडात बोट का घालतात? 'ही' आहेत कारणं

लहान मुलं तोंडात बोट का घालतात? ‘ही’ आहेत कारणं

Subscribe

अनेकदा तुम्ही लहान मुलांना तोंडात बोटे घालताना पाहिलं असेल. तोंडात बोटे घालणे, अंगठा चोखणे या सर्व गोष्टी लहान मुलांमध्ये सामान्य आहेत. मात्र, कालांतराने पुढे जाऊन ही सवय वाढते. त्यामुले अनेक पालक मुलांना ओरडतात. मुले जर बोटे तोंडात घालत असतील किंवा अंगठा चोखत असतील तर पालक मुलांच्या तोंडातून बोटे काढतात. अशावेळी मुले जोरजोराने रडू लागतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की, लहान मुले तोंडात बोटे का घालतात? नक्की यामागची कारणे काय आहेत.

दात येणे –
मुलांचे दात येणार असतील तर लहान मुले तोंडात बोटे घालतात. जेव्हा मुलांना दात येत असतात तेव्हा हिरड्यांना खाज येत असते. त्यामुळे मुले तोंडात बोटे घालतात. त्यामुळे 5 ते 6 महिन्यांची मुले जास्त प्रमाणात तोंडात बोटे घालतात.

- Advertisement -

झोप येत असेल तर –
लहान मुलांना जेव्हा झोप येते तेव्हा ती बोटे तोंडात घालतात. जर तुमचे बाळ दूध प्यायल्यानंतर बोटे तोंडात घालत असेल तर याच अर्थ असा की, त्याला झोप आली आहे.

- Advertisement -

भूक लागल्यावर –
2 ते 1 वर्ष वयोगटातील मुले भूक लागल्यावर तोंडात बोटे घालतात. जर तुमचे बाळ 1 ते 2 तास खेळल्यानंतर वारंवार तोंडात बोटे घालत असेल तर समजून जा की त्याला भूक लागली आहे. त्यामुळे त्याला लगेचच दूध पाजायला हवं.

आनंदी असताना –
लहान मुलांना बोलता येत नाही त्यामुळे ती तोंडात बोटे घालून आनंद व्यक्त करतात. जर तुमचे मूल एखादयाकडे पाहून हसत असेल आणि नंतर तोंडात बोटे घालत असेल तर समजून जा की, तुमचे बाळ आनंदी आहे.

घाबरलेल्या स्थितीत असताना –
अनेकदा अनोळखी ठिकाणी गेल्यावर किंवा अनोळखी व्यक्ती भेटल्यावर तोंडात बोटे घालते. याचे कारण, म्हणजे ते आतून घाबरलेले असतात. अशा वेळी मुलांना जवळ घेण्याची गरज असते. अशा परिस्थितीत तुम्हाला त्याच्या आजूबाजूचे वातावरण बदलायला हवं. त्याची भीती घालविण्याचा प्रयन्त करायला हवेत.

 

 


हेही वाचा : मुलांसाठी हेल्दी ब्रेकफास्ट

 

- Advertisment -

Manini