अनेकांना दररोजच्या जेवनात फळं, डाळी भाज्यांपेक्षा मांसाहारचे सेवन करायला खूप आवडते. मांसाहारामध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन असते. मात्र, सतत मासांहार करणं शरीरासाठी फारसं चांगलं मानलं जात नाही. त्यामुळे आज मांसाहारी व्यक्ती काही महत्त्वाच्या टीप्स सांगणार आहोत.
मांसाहार खाणं कोणी टाळावे ?
मधूमेह, रक्तदाब, लठ्ठपणा असलेल्यांनी रेड मीट खाणे टाळावे. अशा रुग्णांमध्ये फॅट साचून ब्लॉकेजेस तयार होणे धोकादायक ठरू शकते. त्यांच्या आहारात लो-फॅट पदार्थांचा अधिक समावेश असणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी मासे हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये मॅग्नेशियम व ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा समावेश असतो. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
मांसाहारींसाठी खास डाएट टिप्स
- हृदयविकाराचा त्रास असलेल्यांनी आणि हेल्थ कॉन्शियन्स असलेल्यांनी रेड मीट पंधरा दिवसांतून एकदाच खावे. तसेच वजन आटोक्यात ठेवण्यासाठी योग्य व्यायामदेखील करा.
- दिवसभर बसून काम करत असाल तर आठवड्यातून केवळ 1-2 अंडी खावीत किंवा केवळ अंड्याचा पांढरा भाग खावा.
- आहारात मासे किंवा चिकन, टर्की यांसारखे व्हाईट मीट ठेवा. तसेच डीप फ्राय करणे टाळा.
- अंड उकडणे किंवा हाफ बॉईल करणे हे तळण्यापेक्षा अधिक फायदेशीर आहे. मासे/अंडी फ्राय केल्याने त्यातील प्रोटीन्स कमी होतात व पचायला कठीण होतात.
- प्रोटीन्सयुक्त पदार्थातून हीट बाहेर पडते तसेच ते पचायला जड असतात. त्यामुळे भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.
- यरिक अॅसिडचे प्रमाण वाढलेले असल्यास मांस खाणे टाळा.
हेही वाचा :