Sunday, May 19, 2024
घरमानिनीHealthलहान मुलांची दृष्टी सुधारण्यासाठी साधे सोपे व्यायाम

लहान मुलांची दृष्टी सुधारण्यासाठी साधे सोपे व्यायाम

Subscribe

जग पाहण्यासाठी दृष्टी असणे आवश्यक आहे. पण, हल्ली लहान वयातच चिमुरड्यांची दृष्टी कमी होऊ लागली आहे. खरं तर यामागचे कारण ठरतंय ते म्हणजे चुकीची लाइफस्टाइल, असंतुलित आहार आणि मुलांचा वाढता स्क्रीन टाइम. स्क्रीनमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे डोळ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे लहान वयातच मुलांना चष्मा लागतोय. अशा परिस्थितीत पालकांची चिंता मात्र आणखीनच वाढतेय. अशावेळी लहान मुलांची दृष्टी सुधारण्यासाठी साधे सोपे व्यायाम करता येतील, जेणेकरून मुलांचे डोळे निरोगी राहतील.

- Advertisement -

मुलांची दृष्टी वाढविण्यासाठी व्यायाम –

डोळे डावे – उजवा वळवा –

- Advertisement -

दृष्टी सुधारण्यासाठी मुलांना डोळे डावी- उजवीकडे फिरवणारा व्यायाम प्रकार करायला लावा. डोळे फिरविण्यासाठी सरळ बसून मान स्थिर ठेवावी लागेल. केवळ डोळे फिरविण्याच्या या व्यायामाने मुलांची दृष्टी नक्कीच सुधारू शकते. डोळे फिरविण्याच्या व्यायामाने डोळयांची हालचाल सुधारते.

डोळे मिचकावणे –

पापण्या मिचकावणे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. 10 सेकंड जरी तुम्ही डोळ्यांची उघडझाप केलीत तरी याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. हा व्यायाम करण्यासाठी मुलांना 10 सेकंड डोळे मिचकवायला सांगा आणि नंतर 20 सेकंड डोळे बंद ठेवायला सांगा. मुलांना हा व्यायाम दिवसातून 4 ते 5 वेळा करायला लावा, यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

नजर टाकणे –

मुलांना दृष्टी सुधारण्यासाठी नजरेचा व्यायाम करायला लावा. याला त्राटक या नावाने देखील ओळखले जाते. हा व्यायाम प्रकार करण्यासाठी एका वस्तूवर लक्ष केंद्रित करण्यास मुलांना सांगा. नजरेच्या व्यायामाने डोळ्यांवरील ताण कमी होतो. स्क्रीन टाइममुळे निर्माण होणारा ताण दूर करण्यासाठी नजरेचा व्यायाम खूप प्रभावी ठरतो.

पामिंग –

डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी पामिंग हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. पामिंगमुळे डोळ्यांची साईट सुधारते. यासाठी तळवे उबदार होईपर्यंत एकमेकांवर चोळावे लागतात. यानंतर आता डोळे बंद करा आणि त्यांच्यावर उबदार तळवे ठेवा. असे काही मिनिटे करा, यामुळे मुलांची दृष्टी सुधारू शकेल.

 

 

 

 


हेही वाचा : World Oral Health Day: या कारणांमुळे मुलांचे दात किडतात

 

- Advertisment -

Manini