Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthWorld Oral Health Day: या कारणांमुळे मुलांचे दात किडतात

World Oral Health Day: या कारणांमुळे मुलांचे दात किडतात

Subscribe

World Oral Health Day दरवर्षी 20 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. ओरल आरोग्याबाबत लोकांना जागरूक करणे हा या मागचा उद्देश असतो. FDI अर्थात वर्ल्ड डेन्टल फेडरेशनने या दिवसाचे आयोजन केले आहे. तोंडाचे आरोग्य समस्या आणि ओरल आरोग्यचे महत्त्व याबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी वर्षभर मोहीम सुरु केली जाते. आजकाल तोंडाच्या आरोग्यच्या समस्या सामान्य झाल्या आहेत.

साधारणतः लहान मुलांमध्ये ओरल हेल्थची समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. लहान मुलांचे संगोपन करणे ही पूर्णपणे आईवडिलांची जबाबदारी असते. पालकांमध्ये मुलांचे ओरल आरोग्य राखणे ही सध्या चिंतेची बाब झाली आहे. हल्ली लहान मुलांमध्ये दात किडण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुलांच्या दातांमध्ये जंत होऊ नये, दातदुखी, पोकळी यासारख्या समस्यांना मुलांना तोंड द्यावे लागू नये, म्हणून पालक नेहमी चिंतेत असतात.

- Advertisement -

दातांमध्ये पोकळीनंतर, मुलांना दातदुखी, हिरड्या सुजणे आणि खाताना पिताना त्रास होणे यासारख्या समस्या लहान मुलांना प्रामुख्याने जाणवतात. ज्याचा मुलांना खूप त्रास होतो. लहान मुलांमध्ये दात किडल्यानंतरच्या समस्या टाळण्यासाठी काही गोष्टींची आधीच काळजी घेणं आवश्यक असते. जसे की, काही योग्य सवयी मुलांना लावणे, चुकीच्या सवयी बदलणे.

दात किडण्याची चिन्हे –

- Advertisement -

पांढरे डाग – दात किडण्याची पहिले चिन्ह म्हणजे दातांवर पांढरे डाग येणे.

संवेदनशीलता – ज्या मुलांचे दात गरम, थंड किंवा गोड पदार्थ खाल्यामुळे सेन्सटीव्हिटी दर्शवितात. असे दातही किडलेले असतात.

पिवळे पडणे – दातांवर पिवळे डाग, दातांमध्ये पोकळी किंवा दांतांमध्ये कोणतंही लक्षणीय बदल होणे.

दात किडण्याची कारणे –

  • दातांची स्वछता न राखणे.
  • जंक फूड खाण्याची सवय.
  • पौष्टीकतेची कमतरता
  • अनुवंशिकतेमुळे
  • कौटुंबिक इतिहास असल्यास दात खराब होतात.

दातांची निगा कशी राखाल?

  • साखर, चॉकलेट, जेली आणि कोल्ड्रिंस आदी गोड पदार्थ मुलं देऊ नका.
  • मुलांना च्युइंगमची सवय असेल तर ती आजच सोडायला लावा.
  • मुलांना दिवसातून दोनदा ब्रश करण्याची सवय लावा.
  • मुलं अति थंड आणि अति गरम पदार्थ खायला देऊ नका.
  • नूडल्स, ब्रेडसारखे पिठापासून बनवलेल्या गोष्टी खाणे बंद करा.
  • दातांच्या आरोग्यसाठी मुलांना कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि फॉस्फरस असलेले पदार्थ खायला द्या.

 

 


हेही वाचा : Health Tips : मुलांची उंची वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ उपयुक्त

 

- Advertisment -

Manini