व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी अशी घ्या खबरदारी

व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी अशी घ्या खबरदारी

हवामान झपाट्याने बदलत आहे. कधी सकाळी थंडीची अनुभूती येत आहे तर अचानक हवामानात उष्णता जाणवत आहे. अशा बदलत्या हवामानात व्हायरल इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. थोडासाही हलगर्जीपणा झाला तरी रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ शकते. अशा वेळी व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. तुम्हालाही बदलत्या ऋतूत व्हायरल इन्फेक्शन टाळायचे असेल तर तुम्ही काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी उपाय –

व्हायरल इन्फेक्शन टाळायचे असेल तर सर्वप्रथम बाहेरचे अन्न खाणे टाळावे करा बाहेरच्या अन्नाचा स्वच्छेतेशी दूरचाही संबंध नसतो. अशाने तुम्ही आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ताजे आणि घरगुती पदार्थ खाण्याचा प्रयन्त करा.

तुमच्या आजूबाजूचे अथवा घरातील व्यक्ती व्हायरल फिवरच्या विळख्यात सापडलेले असतील तर सर्वात आधी स्वतःच्या इम्यूनिटीवर लक्ष केंद्रित करा.

संतुलित आहार घ्या, व्हिटॅमिन सी असलेली फळे खा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि रोग टाळता येतात.

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. अशा ठिकाणी गेल्यास हाताने नाक आणि डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे. बाजरपेठेच्या ठिकाणी गेल्यास लोकांसोबत अंतर राखा.

जास्तीत जास्त पाणी प्या. पाणी पिल्याने शरीर हायड्रेट राहते. जेव्हा तुम्ही हायड्रेट राहता तेव्हा शरीरातील टॉक्सिन्स सहज बाहेर पडतात. पाणीपिताना कायम उकळवून सामान्य तापमानावर आणलेले पाणी पिणे अधिक फायद्याचे ठरते.

जर तुम्ही बाहेर प्रवासासाठी निघाला असाल तर मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नका. अशाने जरी संक्रमित व्यक्ती जवळपास असेल तरीही तुम्ही संसर्ग टाळू शकता. प्रवासात सुरक्षित राहण्यासाठी नेहमी सॅनिटायझरचा वापरत राहा.

 

 


हेही वाचा :  उन्हाळ्यात काय खावं आणि काय टाळावं?

 

First Published on: March 22, 2024 4:41 PM
Exit mobile version