हृदयालाही असते डिटॉक्सची गरज

हृदयालाही असते डिटॉक्सची गरज

बदलत्या लाइफस्टाइलमुळे हृदयाशी संबंधित समस्या अधिक प्रमाणात वाढत आहेत. दिवसेंदिवस हार्ट अटॅकने जीव गमावण्याच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशा परिस्थितीत लोकांनी हृदयाच्या आरोग्याविषयी अधिक जागरूक असणे गरजेचे आहे. लाइफस्टाइलमधील बदलामुळे आणि योग्य आहारामुळे हा धोका कमी करण्यात येऊ शकतो. यासह तुमचे हृदय वेळोवेळी डिटॉक्स होणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. यासाठी काही आयुर्वेदिक टिप्स तुम्हाला मदत करू शकतील.

हृदयासाठी प्रभावी आयुर्वेदिक पदार्थ – हृदय डिटॉक्स करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी योग्य आहार करणे महत्वाचे आहे. आयुर्वेदानुसार असे अनेक पदार्थ आहेत ज्याने हृदय डिटॉक्स होऊ शकते. यासाठी आपल्याला केवळ काही अन्न पदार्थ खाण्याची गरज आहे. हिरव्या पालेभाज्या, आवळा, धान्ये, ऑलिव्ह ऑइल, लसूण, लिंबू, नट यासारखे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.

हृदयासाठी प्रभावी आयुर्वेदिक औषधी –

त्रिफळा – त्रिफळा संपूर्ण आरोग्य राखण्यास मदत करते. विशेषतः हृदयाच्या आरोग्यासाठी खूप प्रभावी आहे. त्रिफळाच्या सेवनाने शरीरातील उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते.

अर्जुनाची साल – हृदय संरक्षणात्मक औषधी वनस्पती म्हणजे अर्जुनची साल. याच्या सेवनाने रक्ताभिसरण वाढते आणि स्नायूंना बळकट करते.

अश्वगंधा – अश्वगंधाच्या सेवनाने हृदयाचे स्नायू मजबूत होतात. तसेच रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते.

लसूण पाकळया – लसूण हे अत्यंत प्रभावी सुपरफूड आहे. लसणाच्या पाकळ्या चावून तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता. यामुळे रक्तातली कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य राहून रक्तवाहिन्या निरोगी राहतात.

हृदय डिटॉक्सच्या इतर पद्धती जाणून घेऊयात –

आयुर्वेदिक मसाज –
मसाज केल्याने शरीरात ब्लड सर्क्युलेशन वाढते. ज्याने हृदयाला पंप करणे सोप्पे जाते आणि रक्तदाब देखील सामान्य राहतो. मसाज तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता. यासाठी कोणतेही तेल कोमट करून घ्या आणि तुमची मान, छाती, हात आणि पाय यांना मसाज करा.

मेडिटेशन आणि दीर्घ श्वास –
मेडिटेशन आणि श्वासोच्छवासाच्या नियमित व्यायामाने ब्लड प्रेशर सामान्य राहते. परिणामी, हृदयाचे आरोग्य सुधारते.

हायड्रेशन आणि डिटॉक्स पेय –
नियमितपणे पाणी प्या. जेव्हा शरीर हायड्रेटेड राहते. तेव्हा शरीरातील विष बाहेर काढून टाकण्यास सोप्पे जाते. याशिवाय लिंबू पाणी, आवळा ज्यूस, कोरफडीचा रस आदी डिटॉक्स पेये अवश्य प्या.

पुरेशी झोप –
हृदयाच्या आरोग्यासाठी झोपेची गुणवत्ता आणि वेळ दोन्ही अत्यंत महत्वाचे आहे. हे हृदयासाठी सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे कार्य करते. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली तर हृदयाचे आरोग्य सुधारते आणि झोप पूर्ण न झाल्यास झोपेच्या कमतरतेमुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका अधिक वाढतो.

 

 


हेही वाचा : हार्ट अटॅक आल्यावर १५ मिनिटात करा ‘या’ गोष्टी

First Published on: February 12, 2024 4:13 PM
Exit mobile version