Saturday, May 11, 2024
घरमानिनीHealthहार्ट अटॅक आल्यावर १५ मिनिटात करा 'या' गोष्टी

हार्ट अटॅक आल्यावर १५ मिनिटात करा ‘या’ गोष्टी

Subscribe

बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना हार्ट अटॅकसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागणे हे सामान्य झाले आहे. अनेकांना तर हसत-हसत हार्ट अटॅक आला आहे आणि त्यांनी मृत्यूला कवटाळले आहे शिवाय जिम आणि वर्कआउट करताना अनेक जण हार्ट अटॅकला बळी पडले आहेत. अशाने लोकांच्या मनात हार्ट अटॅकविषयी मोठ्या प्रमाणात भीती वाढली आहे. त्यामुळे हार्ट अटॅक आणि त्यावरील उपचारांवरील जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे.

विशेष करून हार्ट अटॅक आल्यावर उपचार कोणते करायचे? कोणती खबरदारी घ्यायची? याची माहिती असणे आवश्यक आहे. खरे तर, हार्ट अटॅक आल्यानंतर तातडीने उपचार मिळाल्यास मृत्यूचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो. पण, उपचार मिळेपर्यंत काही प्राथमिक उपचार करणेही आवश्यक आहे.

- Advertisement -

या लक्षणांवरून ओळखा हार्ट अटॅकचा धोका –

1.श्वास घेण्यासोबतच छातीत तीव्र वेदना जाणवणे हे मुख्य लक्षण आहे.
2.थकवा जाणवणे किंवा चक्कर येणे.
3.मान, खांदे, पाठ आणि हातांमध्ये तीव्र वेदना जाणवणे.

- Advertisement -

 

प्रथमोपचारासाठी काय कराल?

  • सर्वप्रथम रुग्णवाहिका किंवा वैद्यकीय उपचार घेण्याचा प्रयन्त करा.
  • उपचार घेण्यापूर्वी रुग्णाला सपाट जागेवर झोपवा.
  • पेशंटनला पुरेसा ऑक्सिजन मिळणे गरजेचे असते. त्यामुळे त्या व्यक्तीला पंखा किंवा कुलर समोर झोपवा.
  • जर व्यक्तीने घट्ट कपडे घातले असतील तर प्रथम ते सैल करा.
  • हार्ट अटॅकमुळे शरीरातील रक्त आणि ऑक्सिजनचे सर्क्युलेशन विस्कळीत होते. अशावेळी सीपीआरद्वारे छाती दाबून शरीरातील रक्तप्रवाह नॉर्मल ठेवण्याचा प्रयन्त करा.
  • सीपीआरसाठी तळहातांच्या सहाय्याने एका मिनिटात दोन्ही हात जोडून छाती सुमारे १००- २०० वेळा दाबली जाते. मात्र, छाती दाबताना ती अति जोर देऊन दाबू नये.
  • सीआरपी हा हार्ट अटॅकवर उपचार नाही तर तो एक उपाय आहे. ज्याद्वारे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन कृत्रिमरीत्या सामान्य आणण्याचा प्रयन्त केला जातो.
  • मृत्यू आणि इतर धोके टाळण्यासाठी सीआरपी नंतर शक्य तितक्या लवकरत लवकर वैद्यकीय उपचार घेण्याचा प्रयन्त करा.

 

 


हेही वाचा ; ‘ब्रोकन हार्ट सिंड्रोम’ची लक्षणे आणि उपाय

 

- Advertisment -

Manini