Sunday, May 19, 2024
घरमानिनीHealthनिरोगी हृदयासाठी 'हे' ज्यूस फायद्याचे

निरोगी हृदयासाठी ‘हे’ ज्यूस फायद्याचे

Subscribe

हृदयाशी संबंधित आजारांमुळे जगात सर्वाधिक लोकांचे मृत्यू होत आहेत. दिवसेंदिवस हृदयविकाराच्या झटक्याची प्रकरणे वाढत चालली असून याचे प्रमाण वृद्धांसोबतच तरुणांमध्ये दिसून येत आहे. खरे पाहता, अयोग्य आहार आणि चुकीची लाइफस्टाइल याचा आपल्या हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अशावेळी तज्ज्ञांच्या मते, काही ज्यूसचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राखता येते.

हिरव्या पालेभाज्यांचा ज्यूस –
हिरव्या पालेभाज्यांचा ज्यूस हृदयासाठी फायदेशीर ठरतो. याशिवाय तुम्ही पालक आणि स्विस चार्ड यांचाही ज्यूस पिऊ शकता. हे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सीडेंट्सने समृद्ध आहे, ज्यामुळे रस्क्तवाहिन्यांमधील जळजळ कमी होते आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारते. हिरव्या पालेभाज्यांच्या ज्यूसमध्ये ‘व्हिटॅमिन के’ असते जे रक्त पातळ करते.

- Advertisement -

बीटरूट ज्यूस –
हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी तुम्ही बीटरूटचा ज्यूस पिऊ शकता. बीटरूटमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असते, जे हाय ब्लड प्रेशरवर उपचार करते आणि रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते. वास्तविक, हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, त्यामुळे निरोगी हृदयासाठी बीटाचा ज्यूस प्यायला हवा.

- Advertisement -

आंबटवर्गीय फळे –
तुम्ही मॉर्निंग रुटीनमध्ये आंबटवर्गीय फळांचा ज्यूस प्यायला हवा. हृदयाचे आरोग्य राखण्यास आंबटवर्गीय फळे फायदेशीर मानली जातात. आंबटवर्गीय फळांमध्ये तुम्ही संत्र्यासारख्या फळांचा ज्यूस पिऊ शकता. जे सर्व हाय फायबर, व्हिटॅमिन ‘सी’ आणि फ्लेवोनाईड्सने परिपूर्ण आहे. आंबटवर्गीय फळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारतात.

डाळींबाचा ज्यूस –
डाळींबाचा ज्यूस देखील हृदयाचे आरोग्य राखण्यास फायदेशीर आहे. त्यात अँटी ऑक्सीडेंट्स आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात, हे हृदय रोगाच्या विकासास प्रतिबंधित करतात. डाळींबात पॉलिफेनॉल असतात, जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात आणि ब्लड प्रेशरही नियंत्रणात ठेवतात.

टोमॅटो ज्यूस –
हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी तुम्हाला टोमॅटोचा ज्यूस फायदेशीर ठरतो. अभ्यासानुसार, टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि हाय ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये लाईकोपिन असते. जे एक शक्तिशाली अँटी ऑक्सीडेंटन्स आहे जो जळजळ आणि LDL कोलेस्ट्रॉलची लेवल कमी करून हृदयाचे आरोग्य निरोगी राखायला मदत करतो.

 

 

 


हेही वाचा : कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उन्हाळ्यात करा ‘या’ फळांचे सेवन

 

- Advertisment -

Manini