Saturday, April 27, 2024
घरमानिनीHealthमधुमेहच्या रुग्णांसाठी बेस्ट आहेत 'हे' 5 ज्युस

मधुमेहच्या रुग्णांसाठी बेस्ट आहेत ‘हे’ 5 ज्युस

Subscribe

जगभरातील लाखो लोक प्री-डायबिटिक असून त्यांना माहितीच नाही की, येणाऱ्या काळात ते मधुमेहाचे रुग्ण होणार आहेत. हाय ब्लड शुगर एक भयंकर आजार असून त्यावर नियंत्रण ठेवणे फार महत्वाटे असते. कारण तुमचे स्नायू आणि किडनी डॅमेज करु शकते. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका वाढला जातो.अशातच मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी पुढील काही ज्युस बेस्ट आहेत. ते मधुमेह मॅनेजच नव्हे तर आणखी काही फायदे सुद्धा देतात. (Healthy juices for diabetic patient)

-उपाशी पोटी मेथीदाण्याचे पाणी

- Advertisement -


मेथीदाण्याचे पाणी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फार फायदेशीर असते. यामध्ये सॅपोनिन तत्व असतात जे कार्बोहाइडट्रेट ब्रेक करण्याच्या वेगाने काम करते. ज्यामुळे रक्तातील ग्लुकोज वाढत नाही.

-आवळा, एलोवेरा ज्युस

- Advertisement -


आवळा आणि एलोवेरा ज्युस हा मधुमेहाच्या रुग्णाला आवर्जुन दिला जातो. यामुळे इंन्सुलिनचे प्रोडक्शन वाढते, जे रक्तातील साखर रेग्युलेट करते. हे ज्यूस त्वचेसंबंधित समस्येवर ही फायदेशीर असतात.

-चिया सीड्सचे पाणी


रात्रभर एका ग्लासात चियाचे सीड्स पाण्यात भिजत ठेवा आणि हेच पाणी सकाळी प्या. यामुळे शरिरातील टॉक्सिन शरिरातून बाहेर काढण्यासह ब्लड शुगरचा स्तर नियंत्रित ठेवतो. या ज्यूसमुळे फायबर, प्रोटीन आणि ओमेगा-3 सुद्धा मिळते. जे ड्राइनेस-कोलेस्ट्रॉलसाठी फायदेशीर ठरते.(Healthy juices for diabetic patient)

-तुळशीची चहा


तुळशीची चहा बनवण्यासाठी तुळशीची पाने उकळून ती प्या. यामुळे शरिरातील इंसुलिन सेंसिटिव्हिटी आणि ग्लुकोज मेटाबॉलिज्म वाढते. त्याचसोबत शरिरातील ग्लुकोजचे पचन होते आणि हाय ब्लड शुगर ही होत नाही. हा घरगुती उपाय वापरुन तुम्ही इम्युनिटी सुद्धा वाढण्यास मदत होते.


हेही वाचा- Weight Gain साठी ‘या’ आयुर्वेदिक टीप्स जरुर फॉलो करा

- Advertisment -

Manini