प्रेगन्सीमध्ये या गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरा

प्रेगन्सीमध्ये या गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरा

प्रेगन्सीचा काळ कोणत्याही स्त्रीसाठी महत्वाचा असतो. या काळातील थोडीशी निष्काळजीही आई आणि बाळाच्या आरोग्यसाठी घातक ठरू शकते. विशेषतः या काळात वापरल्या जाणाऱ्या गोष्टींचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. अशा परिस्थितीत प्रेगन्सीमध्ये खाणे आणि काही गोष्टींचा वापरताना काळजी घेणे आवश्यक असते. प्रेगन्सीमध्ये शरीरात हार्मोनल बदल झपाट्याने होतात, त्यामुळे शरीर अत्यंत संवदेनशील बनते. या संवेदनशीलतेमुळे, प्रेग्नेंट महिलेचे शरीर अन्नपदार्थासह विविध गोष्टींवर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देते. काहीवेळा ही प्रतिक्रिया घातक ठरू शकते, ज्यामुळे गर्भातील बाळाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

फूड सप्लिमेंट्सचे सेवन – निरोगी बाळासाठी प्रेग्नन्सीमध्ये फूड सप्लिमेंट्स वापरणे सामान्य झाले आहे, पण काही महिला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायही सप्लिमेंट्स घेणे सुरु करतात. असे करणे आरोग्यच्या दृष्टिकोनातून अत्यंत चुकीचे आहे. वास्तविक, डॉक्टर कोणतीही सप्लिमेंट्स फक्त तुमच्या शारीरिक तपासणीच्या आधारवर घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सप्लिमेंट्स घ्यायला हवी.

अँटिबायोटिक औषधे – प्रेग्नन्सीमध्ये अँटिबायोटिक औषधांचा वापर सुरक्षित मानला जात नाही. विशेषतः, प्रेग्नसीच्या तिसऱ्या महिन्यानंतर अँटिबायोटिक्स औषधाचा वापर हानीकारक मानला जातो. तथापि, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक अँटिबायोटिक्स औषधे घातक नसतात, पण काही अँटी बायोटिक्स सुरक्षित देखील आहेत. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

पेंट आणि डिस्टेंपरचा वापर – प्रेगन्सीदरम्यान, प्रेग्नेंट महिलेने पेंट आणि डिस्टेम्परचा वापर हुशारीने केला पाहिजे. खरं तर, यामध्ये अनेक प्रकारची धोकादायक रसायने आढळतात, जी प्रेग्नेंट महिलेसाठी तसेच गर्भाशयात असलेल्या बाळासाठी हानिकारक असू शकतात. त्यामुळे भिंती रंगविणे आणि साफ करणे यासारख्या कामापासून लांब राहायला हवे.

फेअरनेस क्रीमचा वापर – प्रेगन्सीदरम्यान केमिकल असलेल्या सौंदर्य उत्पादनाचा वापर करणे देखील हानिकारक ठरू शकते. विशेषतः फेअरनेस क्रीममध्ये वापरले जाणारे हायड्रोक्विन बाळासाठी हानिकारक आहे. यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

हेअर कलर – केस काळे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बहुतेक हेअरकलरमध्ये अमोनिया आढळते. अमोनिया त्वचेसाठी थेट हानिकारक असला तरी त्याचा गर्भातील बाळाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

परफ्युम किंवा डिओडोरंट – परफ्युम किंवा डिओडोरंटच वापर करणे प्रेग्नेंट महिलेसाठी हानिकारक ठरू शकते. यात असणाऱ्या हानिकारक केमिकल्सचा न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. परफ्युममध्ये आढळणारे केमिकल प्रेग्नेंट महिलेला श्वसन आणि त्वचेची एलर्जी होऊ शकते. तर परफ्युममध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे मुलामध्ये जन्मजात दोषांची समस्या निर्माण होऊ शकते.

इलेक्ट्रॉनिक वस्तू – प्रेग्नसीमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरताना काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः मोबाईल, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स यासारख्या किरण उत्सर्जित करणाऱ्या वस्तूंचा वापर टाळायला हवे. अशा इलेकट्रोनिक गॅजेट्समुळे न जन्मलेल्या मुलाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून त्याचा वापर मर्यदित करणे आवश्यक आहे.

 

 


हेही वाचा : नको असलेल्या प्रेग्नसीचे अनेक दुष्परिणाम

 

First Published on: March 19, 2024 4:16 PM
Exit mobile version