Saturday, April 27, 2024
घरमानिनीHealthनको असलेल्या प्रेग्नसीचे अनेक दुष्परिणाम

नको असलेल्या प्रेग्नसीचे अनेक दुष्परिणाम

Subscribe

कुटुंब नियोजनाचा विचार करणे आता पूर्वीपेक्षा सोपे झालं आहे. बदलत्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीमुळे महिला आता खंबीर झाल्या आहेत. आजची महिला आता पूर्वीपेक्षा अधिक निर्भय आणि जागरूक झाली आहे. असे असूनही, बहुतेकदा स्त्रियांना नको असलेल्या प्रेग्नीसीचा सामना करावा लागतो. प्रेगन्सीच्या अचानक निर्माण झालेल्या समस्येमुळे महिलेला स्ट्रेसचा सामना करावा लागतो. याचा पूर्ण परिणाम महिलेच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासोबतच पती-पत्नीच्या नात्यावरही होतो.

अनपेक्षित प्रेगन्सी कशी हाताळाल?

- Advertisement -

अनपेक्षित प्रेगन्सीमुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. महिलांचे लक्ष गर्भधारणेपासून गर्भपात करण्यापर्यत अनेक पर्यायांवर केंद्रित होते. खरे पाहता, बहुतेक कपल्सला दोन मुलांमधील अंतर राखायचे असते. यामुळे अचानक प्रेग्नन्सीचे समजल्यानंतर ते चिंतीत होतात. नको असलेल्या प्रेग्नीसीमधून बाहेर कसे पडायचे?हे जाणून घेऊयात,

सगळ्यात पहिलं टेस्ट करून खात्री करून घ्या –
गर्भपात करण्याच्या विचार करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी अवश्य करून घ्या. घरी प्रेग्नसीचे कन्फर्मेशन मिळाल्यानंतर डॉक्टरकडे अवश्य जा.

- Advertisement -

तुमच्या मतांबाबत पार्टनर्शी बोलून घ्या –
कोणत्याही निर्णयापर्यत पोहोचण्यापूर्वी, पार्टनरशी बोलून घ्या आणि सर्व पैलू लक्षात घेऊन तुमचे मत व्यक्त करा. अशाने तुमचे नाते निरोगी राहते. तुमची बाजू जशी तुम्ही मांडाल तेव्हा पार्टनरचे मतही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. निर्णय परस्पर संमतीनेच घ्या. असे केल्याने नात्यात कटुता निर्माण होत नाही.

प्रेग्नसी नको असेल तर पर्यायांबद्दल जाणून घ्या –
कोणताही पाऊल उचलण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. त्यामुळे कोणत्याही निर्णयापर्यत पोहोचणे सोपे जाते. स्त्रीरोग तज्ज्ञ कपल्सना वय, हार्मोनल बदल आणि प्रजनन क्षमता याबद्दल योग्य माहिती देतात. नको असलेली प्रेग्नसी टर्मिनेट करण्यासाठी गर्भपाताचा अवलंब केला जाऊ शकतो. वास्तविक, ओव्हुलेशनच्या काळात लैगिंक संभोग केल्याने प्रेग्नसी होण्याची शक्यता वाढते. गर्भपातासाठी दोन पद्धतीचा अवलंब केला जाऊ शकतो. वैद्यकीय गर्भपात जो औषधांच्या मदतीने केला जातो आणि सर्जिकल गर्भपात केला जातो, ज्यात डायलेशन आणि ऍव्हॅक्युएशन म्हणजे D&E प्रक्रिया अवलंबली जाते. सामान्यतः गर्भपाताची प्रक्रिया गर्भधारणेच्या १२ आठवड्याच्या आत केली जाते.

स्वतःला भावनिकदृष्ट्या मजबूत बनवा –
अचानक प्रेग्नेंट झाल्याची बातमी कळताच गर्भपाताचा विचार करण्यापूर्वी अस्वस्थ होण्यापूर्वी स्वतःला भावनिकदृष्ट्या मजबूत करा. नैराश्य, चिंता टाळण्यासाठी पार्टनरशी बोला. अचानक झालेल्या या गोष्टीमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत जवळच्या लोकांशी बोला, जेणेकरून तुम्ही योग्य निष्कर्षपर्यत सहज पोहोचू शकाल.

भविष्यात नको असलेली प्रेग्नन्सी टाळण्यासाठी कोणत्या उपायांचा अवलंब करायला हवा ?

कंडोम वापरा – लैगिक संक्रमण आणि नको असलेली प्रेग्नसी टाळण्यासाठी कंडोमचा वापर करा. महिला आणि पुरुषांसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या कंडोमच्या मदतीने नको प्रेग्नंसीचा धोका टाळता येतो.

ओव्हुलेशन दरम्यान सेक्स टाळा – नैसर्गिक मार्गाने प्रेगन्सी टाळण्यासाठी, पिरियड ट्रॅकर अँपची मदत घ्या. याद्वारे, महिला त्यांच्या ओव्हुलेशनचा दिवस सहजपणे शोधू शकतात. यामुळे, सूचित केलेल्या ओव्हुलेशन कालावधीत लैगिक संबंध टाळा.

गर्भनिरोधक इंजेक्शन – अनपेक्षित गर्भधारणा टाळण्यासाठी पर्यायी म्हणून गर्भनिरोधक इंजेक्शन वापरली जातात. त्याचा प्रभाव शरीरात तीन महिने टिकतो. यामुळे रक्तामध्ये हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे गर्भधारणेपासून आराम मिळतो.

IUD वापरू शकतो – IUD हे टी- आकाराचे उपकरण आहे. प्रेग्नसी टाळण्यासाठी, पिरीएड्सच्या सातव्या दिवशी ती योनीमध्ये घातली जाते. त्याच्या मदतीने, अंडी स्पर्मच्या संपर्कात येत नाही आणि फर्टिलायझेशन होत नाही.

 

 


हेही वाचा : कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेण्याचे दुष्परिणाम

- Advertisment -

Manini