Wednesday, September 27, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health सुट्टीच्या दिवशीची अधिकची झोप ठरू शकते घातक

सुट्टीच्या दिवशीची अधिकची झोप ठरू शकते घातक

Subscribe

आठवड्यातील 5 ते 6 दिवस आपण काम करतो. पण हे करता असताना अनेकदा आपली पुरेशी झोप होत नाही.त्यामुळे बरेचजण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किंवा त्यांना ज्यादिवशी सुट्टी असते त्यादिवशी आराम करण्याचे ठरवतात. दररोजच्या धावपळीत 6 ते 7 तासांची झोप होत असली तरी सुट्टीच्या दिवशी 8 तासांची किंवा त्यापेक्षा जास्त झोप घ्यायची ठरवतात.पण हि सुट्टीच्या दिवशीची अधिकची झोप घातक ठरू शकते का ?वाचा संपूर्ण लेख

हेही पाहा रात्री झोपण्यापूर्वी ‘या’ अनहेल्दी पदार्थांचे सेवन ठरू शकते घातक

- Advertisement -

व्यक्तीची झोप पूर्ण नाही झाली तर त्याला आळस यायला लागतो.दुसऱ्या दिवशी पुन्हा कंटाळवाणा दिवस जातो.पण त्यासाठी आठवडाभर जास्तवेळ काम केलं आणि विश्रांती म्हणून फक्त सुट्टीच्या दिवशी पूर्ण दिवस झोपून काढत असाल तर हे शरीराला घातक ठरू शकतं.शरीर आणि मन थकलेले असल्याने आपल्याला असा आराम करावासा वाटतो किंवा आराम करण्याची इच्छा होते. कित्येकदा आपली बाहेर कुठेच जाण्याची इच्छा होत नाही . त्याऐवजी घरी आराम करणं सोयीस्कर वाटतं.मात्र असे करणे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नसते. प्रमाणापेक्षा जास्त झोपल्याने हृदयाशी निगडीत विविध तक्रारी उद्भवतात. त्याचबरोबर मानसिक आणि शारीरिक अस्थिरता निर्माण होते.

सुट्टीच्या आदल्या दिवशी जास्त वेळ जागरण करून चित्रपट किंवा पार्टी केल्या जातात आणि त्यामुळे पुन्हा दुसऱ्या दिवशी अवेळी झोपणं ,खाणं यामुळे पुन्हा पित्ताचा त्रास काहींना सुरु होतो. यामध्ये झोपेची आवश्यकता सतत भासते आणि त्यामुळे माणूस फ्रेश वाटत नाही.झोपेच्या वेळा दररोजच्या धावपळीतून नियमितपणे पाळल्या तर अनेक आजार बरे होऊ शकतात. पण जर आठवडाभर कमी झोपून एकाच दिवशी जास्त झोप काढत असाल तर मात्र शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini