लहान मुलांना पौष्टिक पदार्थ खाऊ घालणे अतिशय गरजेचे आहे. हल्ली मुलं काहीही बाहेरचं खातात आणि यामधून मुलांना कोणत्याही प्रकारचे पोषण मिळत नाही. अशातच लहान मुलांना ब्रेडचा खाऊ नक्कीच आवडेल यासाठी जाणून घ्या साहित्य आणि कृती….
साहित्य
- 5/6 स्लाईस्ड ब्रेड.
- 1 काप दूध.
- 2 चमचे साखर.
- काजू काप (प्रमाणानुसार)
- बदाम काप (प्रमाणानुसार)
- दुधाचा मसाला.
कृती
- सर्वात प्रथम दूध आटवून घ्यावं. अशातच जर का (1 लिटर दूध घेतल्यास ते अर्धा लिटर होईल इतकं आटवावं.)
- त्यात साखर घालून जरा वेळ गॅसवरच हलवत राहावं.
- यानंतर गॅस बंद करून दूध गार करावं.
- आता ब्रेडची एक स्लाईस घ्यावी. त्यावर पुरेल इतकाच गोल डबा घेऊन त्या डब्याच्या झाकणानं दाबून ब्रेड स्लाईस गोलाकार आकारात कट करून घ्यावी.
- याप्रमाणे सर्व ब्रेड स्लाईसेस गोलाकारात कट कराव्या.
- हे झाल्यावर खोलगट डिशमध्ये एक ब्रेड स्लाईस ठेवून त्यावर चमच्याने मसाला दूध घाला.
- तसेच स्लाईस पूर्ण भिजेल इतपत त्यावर दुसरी स्लाईस ठेवून पुन्हा मसाला दूध घालावं.
- त्यावर अजून एक स्लाईस ठेवून मसाला दूध घालून त्यावर दूधाचा मसाला पसरून घ्यावा व त्यात काजू, बदाम काप घालावे.
- आता ब्रेडचा खाऊ तयार आहे.
हेही वाचा : पापडापासून बनवा कुरकुरीत डोसा
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -