Eco friendly bappa Competition
घर क्राइम शिवसैनिकाच्या हत्येतील आरोपीची जामिनावर सुटका; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, वाचा- काय आहे प्रकरण?

शिवसैनिकाच्या हत्येतील आरोपीची जामिनावर सुटका; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, वाचा- काय आहे प्रकरण?

Subscribe

2020 मध्ये महाराष्ट्रातील लोणावळा येथील शाखा प्रमुख राहुल उमेश शेट्टी यांची 26 ऑक्टोबर 2020 रोजी भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

नवी दिल्ली : मागील 2020 मध्ये एका शिवसैनिकाची हत्या करणाऱ्या आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालानंतर महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या काय प्रतिक्रिया येतात हे येणारा काळच सांगणार आहे. (Accused in Shiv Sainik murder released on bail; Supreme Court Judgment, Read- What’s the Case?)

2020 मध्ये महाराष्ट्रातील लोणावळा येथील शाखा प्रमुख राहुल उमेश शेट्टी यांची 26 ऑक्टोबर 2020 रोजी भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याच प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 29 सप्टेंबर 2022 रोजी अग्रवाल यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. हे विशेष.

- Advertisement -

शिवसेनेचे लोणावळा विभागप्रमुख राहुल उमेश शेट्टी यांची 26 ऑक्टोबर 2020 रोजी भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती बी.आर. गवई, न्यायमूर्ती सी.टी. रविकुमार आणि संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर झाली. या प्रकरणातील इतर सहआरोपींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर मुख्य आरोपी सूरज विजय अग्रवाल यांच्या बाजूने वकील सना रईस खान यांनी केलेल्या युक्तीवादाची दखल घेतली.

या अटींवर दिला जामीन

खंडपीठासमोर महाराष्ट्र पोलीस आणि याचिकाकर्त्यांनी आरोपीच्या जमानत याचिकेला चांगलाच विरोध केला होता. तक्रारकर्त्यांच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून सर्वोच्च न्यायालयाने काही अटींवर हा जामीन मंजून केला. ज्यामध्ये याचिकाकर्त्याने खटला प्रलंबित असताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश, वडगाव, मावळ यांच्या कार्यकक्षेत प्रवेश करू नये, जोपर्यंत त्याला संबंधित न्यायालयात हजर राहणे आवश्यक नाही.

- Advertisement -

हेही वाचा : जखम डोक्याला अन् मलम पायाला; कांदा खरेदीच्या निर्णयावर रोहित पवारांनी फडणवीसांना लगावला टोला

मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती याचिका

29 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अग्रवाल याचा जामीन अर्ज फेटाळला होता. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते की, प्राथमिक तपासात मयताला कॉन्ट्रॅक्ट किलर नेमून संपवण्याचा गुन्हेगारी कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मृतकाचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला होता, याकडे न्यायालय दुर्लक्ष करू शकत नाही. अग्रवाल यांचे राजकीय कारणामुळे मृतकाशी वैमनस्य असल्याचा आरोप करण्यात आला होता.

- Advertisment -