Tuesday, September 26, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Kitchen प्रेशर कुकरमध्ये चुकूनही 'हे' पदार्थ शिजवू नका अन्यथा होईल नुकसान

प्रेशर कुकरमध्ये चुकूनही ‘हे’ पदार्थ शिजवू नका अन्यथा होईल नुकसान

Subscribe

जेवण बनविण्यासाठी प्रत्येक घरात हमखास प्रेशर कुकरचा वापर करण्यात येतो. यामुळे जेवण पटकन तयार होते आणि वेळ वाचतो. मात्र काही पदार्थ असे आहे, जे कुकरमध्ये शिजवून खाण्याने फायदा न होता शरारीत विष पसरविण्याचे काम करतात. तसेच तुमच्या पचनक्रियेपासून प्रतिकारशक्ती कमजोर बनविण्यापर्यंत याचा परिणाम होत असतो.

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. जे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. जर का तुम्ही हिरव्या भाज्या कुकरमध्ये शिजवल्यात तर त्यामधले पोषक तत्वे निघून जातात. ज्यामुळे तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो. तसेच या भाज्यांमध्ये असलेले क्षार हे पाण्यामधून निघून जाते. त्यामुळे शरीराला यामधले स्तव मिळत नाही.

बटाटे

- Advertisement -

बटाटे प्रेशर कुकरमध्ये शिजवल्याने त्यातील स्वाद निघून जाते. याशिवाय नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने दिलेल्या अहवालानुसार, बटाट्यातून येणारे हानिकारक पदार्थ प्रेशर कुकरमधून बाहेर येत नाहीत आणि हे खाल्ल्याने माणसाच्या शरीरावर परिणाम होतो.

नूडल्स

नुडल्समध्ये स्टार्च अधिक प्रमाणात असते, जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कुकरम​ध्ये नुडल्स तयार करताना हा स्टार्च बाहेर येत नाही. त्यामुळे याचा डायरेक्ट परिणाम हा पचनतंत्रावर होतो. यापासून वाचण्यासाठी नुडल्स नेहमी पॅन अथवा कढईमध्ये करावेत.

मासे

- Advertisement -

अनेकांना मासे खाणे आवडते. यामध्ये अनेक पोषक तत्व असतात जे शरीराला आवश्यक असतात. प्रतिकारशक्तीचा मुख्य स्रोत मासे ठरतात. मात्र प्रेशर कुकरमध्ये मासे शिजवल्याने त्यातून निघणारे बॅक्टेरिया शरीराला नुकसानदायी ठरतात. प्रतिकारशक्ती कमी करतात. त्यामुळे कधीही मासे प्रेशर कुकरमध्ये शिजवू नका.

पास्ता

पास्ता आरोग्यासाठी चांगला नाहीच. पण जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये बनवत असाल तर तो अधिक हानिकारक ठरतो. यातील स्टार्च तसाच साचून राहतो आणि स्वादही बदलतो. यापासून वाचण्यासाठी पास्ता नेहमी बाहेर पॅन अथवा कढईत शिजवा.

अंडी

जर का तुम्ही कुकरमध्ये अंडी शिजवत असाल तर ही अंडी फुटू शकतात. तसेच अंड्या मध्ये असलेले प्रोटिन्स कुकरमध्ये शिजवल्यामुळे निघून जाते. अशातच जर का अंडी जास्त शिजली तर अंडी फुटू शकतात.


हेही वाचा : चमचाभर तुपाने चमकवा कढई

- Advertisment -

Manini