Tuesday, September 26, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Kitchen चमचाभर तुपाने चमकवा कढई

चमचाभर तुपाने चमकवा कढई

Subscribe

कोणतेही भांडे जास्त वापल्यावर ते खराब होते अशा परिस्थिती काळी झालेली भांडे स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता. तसेच अॅल्युमिनिअमची अनेक भांडी स्वच्छ करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि ही भांडी पटकन स्वच्छ पण होत नाहीत. अशातच कढई ही सगळ्यात जास्त प्रमाणात सगळेच पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते.

अशा प्रकारे चमकवा कढई

साहित्य

  • कढई
  • 1 टेबलस्पून गरम तूप
  • 1 मोठा कापूस
  • मऊ ब्रिस्टल स्क्रब

कृती

  • कढई धुतल्यानंतर,ती स्वच्छ कापडाने किंवा टॉवेलने पुसून घ्या.
  • यानंतर गॅस चालू करा आणि त्यावर तवा ठेवा आणि थोडा गरम करा.
  • गॅस बंद करा, आणि कढई बाहेर काढा आणि एकदा स्क्रबने स्वच्छ करा.
  • त्यामुळे त्यात साचलेली अतिरिक्त घाण साफ होईल.
  • यानंतर तूप गरम करून त्यात कापूस बुडवून संपूर्ण तव्याला आतून व बाहेरून लावा.
  • आता अशा प्रकारे तुम्ही तुमची इतर भांडी देखील पॉलिश करू शकता.
  • अशा प्रकारे तुमची भांडी नेहमी चमकतील आणि लोखंडासारख्या भांड्यांवर गंजाचे डाग दिसणार नाहीत.

How To Clean Kadai – Kitchen Cleaning Hacks

कढई खराब होण्यापासून वाचवण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

  • सर्व प्रकारची कोणतीही भांडी एकत्र ठेवू नका.
  • तसेच कोणत्याही भांड्याचे हँडल आठवड्यातून दोनदा स्वच्छ करा.
  • अशातच तुम्ही भांड्याचे बोल्ट सहज काढू शकता. आणि त्यांना स्वच्छ करा आणि नंतर पुन्हा त्याचा वापर करा.
  • लोखंडी आणि अॅल्युमिनियमची भांडी एकत्र ठेवू नका. यामुळे भांडी लवकर खराब होण्याची शक्यता जास्त असते.
  • कढई धुतल्यानंतर आधी तिला कोरडी होवू द्या आणि मगच ती भांड्याच्या स्टँडवर ठेवा.
  • तसेच आठवड्यातून एकदा मीठ आणि लिंबूने कढई स्वच्छ करून घ्या.

हेही वाचा :  चाकू सुरीला गंज लागलाय, मग असा करा स्वच्छ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini