Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenअॅल्युमिनियम,स्टिल नाही तर 'या' भांड्यात जेवण बनवल्याने राहाल हेल्दी

अॅल्युमिनियम,स्टिल नाही तर ‘या’ भांड्यात जेवण बनवल्याने राहाल हेल्दी

Subscribe

जेवणाची भांडी आपल्या घरात अनेक प्रकारांनी वापरली जातात. अशातच आपण कोणती भांडी वापरतो जेवणासाठी त्याचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच होत असतो. त्यामुळे आरोग्यासाठी चांगली अशी भांडी रोजच्या रोज वापरा जेणेकरून आपल्या शरीराला याचा परिणाम होत नाही. तसेच काही अशी भांडी असतात ज्यामुळे जेवणाची चव वाढते. आणि त्यामुळे जेवण छान लागते. जेवढे छान जेवण आपण आहारात खातो तेवढेच जे आपल्या शरीरासाठी पौष्टीक असते. तर मग आता आपण अशी भांडी बघणार आहोत जी आपल्या आरोग्यासाठी चांगली असतात. ज्यामुळे शरीर चांगले राहते. जाणून घेऊया आपल्या स्वयंपाक घरात कोणत्या भांड्याचा जास्त वापर करायला हवा.

Abizoe Compact Cookware Set Review: Pick the Best Item - YouTube

- Advertisement -

अॅल्युमिनियम भांडी

अॅल्युमिनियमची सर्वच भांडी वजनाने हलकी असतात. अशावेळी त्याचा किचनमध्ये वापर करणे सोप्पं असते. त्याचबरोबर, अ‍ॅल्युमिनियमची भांडी लवकर गरम होतात. अशावेळी जेवण बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. त्याचबरोबर अ‍ॅल्युमिनियम धातू स्वस्त असल्याने या भांडयाची किंमतही जास्त महाग नाहीये.

स्टीलची भांडी

स्टीलची भांडी लगेच स्वच्छ होतात. तसेच अनेक वर्षानंतरही त्याची चमक कायम ठेवणे शक्य होते. कारण ही भांडी काळी पडत नाहीत. तसंच, स्टील हा धातु जेवणात मिसळत नाही. त्यामुळं तुम्ही शिजवत असलेले जेवण हेल्दी राहते. यात तुम्ही आंबट-चिंबट जेवणाबरोबर सगळ्या प्रकारचे अन्न शिजवू शकता.

- Advertisement -

तांब्याची भांडी 

तांब्याच्या भांड्याचा उपयोग पोटातील गॅसची समस्या दूर करण्यासाठी होतो. या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे स्मरणशक्ती वाढते. शिवाय लिव्हर संबंधित जे काही आजार असतील तर ते देखील दूर होतात.तांब्याच्या भांड्यांतून जेवल्यामुळे आपलं वजन कमी होते, शरीर डिटॉक्स होतं, हिमोग्लोबीन सुधारतं, पचनशक्ती सुधारते, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य सुधारतं, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि त्वचा निरोगी राहते.

काचेची भांडी

काचेच्या भांड्यामध्ये कोणतीही रसायने नसतात, त्यांना गंध किंवा चव नसते. त्यामुळे ते सुरक्षित मानले जाते. काचेच्या भांड्यातून आपण कोणत्याही प्रकारचे अन्न खाऊ शकतो. मात्र, काचेचं भांडं तुटले-फुटलेले असू नये.

सिरॅमिक भांडी

हल्ली सिरॅमिकच्या भांड्यांना बरीच चलती आहे. सिरॅमिकच्या भांड्यांमध्ये कोणतेही केमिकल्स नसल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने सिरॅमिकची भांडी वापरणं हा चांगला पर्याय आहे.

मातीची भांडी

मातीच्या भांड्यांमध्ये जेवण तयार केल्याने किंवा जेवल्याने शरीराला कोणतेही नुकसान होत नाही. आयुर्वेदानुसार, जर भोजन पौष्टिक आणि स्वादिष्ट बनवायचे असेल तर ते हळू हळू शिजवले पाहिजे. मातीच्या भांड्यात जेवण तयार होण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, परंतु आरोग्याला त्यापासून पूर्ण लाभ होतो. मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने १००% पोषण तत्त्व मिळतात. मातीच्या भांड्यात बनविलेल्या पदार्थांचा स्वाद आणि चव देखील खूप सुंदर लागते

चांदीची भांडी

चांदी हा एक शीतल धातू आहे. जो शरीराला आंतरिक थंडावा देतो. चांदीमुळे शरीर शांत राहते. चांदीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने मेंदू तल्लख होतो, डोळ्यांचे आरोग्य वाढते, दृष्टी वाढते आणि याशिवाय पित्तदोष, कफ आणि वायुदोष नियंत्रित राहतो. चांदीच्या पेल्यातून पाणी पिणंही फायदेशीर समजलं जातं कारण चांदीच्या पेल्याने पाणी प्यायल्यामुळे त्या पाण्यात जर काही भेसळयुक्त घटक असतील तर ते निघून जाऊन ते पाणी शुद्ध होतं.

लोखंडाची भांडी

लोखंडी कढई, तवा यांचा वापर पदार्थ बनवायला केल्यामुळे शरीरातलं हिमोग्लोबीन सुधारतं आणि रक्तपेशी वाढायला मदत होते. मात्र लोखंडाच्या कढईत भाजी केलीत तर भाजीत लोह उतरून त्याचा रंग बदलेल. सांबार, रस्सम असे आंबट पदार्थ लोखंडाच्या भांड्यात बनवू नका. नाहीतर, त्या लोखंडाची पदार्थांवर रिऍक्शन होऊन त्यांची चव देखील बदलेल.


हेही वाचा :

जेवण बनवण्यासाठी स्टीलची भांडी योग्य की अ‍ॅल्युमिनियम ?

- Advertisment -

Manini