घरमहाराष्ट्रनाशिक"राहुल गांधी ओरिजनल गांधी नसून खान", शरद पोंक्षेंची टीका

“राहुल गांधी ओरिजनल गांधी नसून खान”, शरद पोंक्षेंची टीका

Subscribe

मालेगाव : राहुल गांधी काही ओरिजनल गांधी नसून खान आहे, अशी टीका अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेस राहुल गांधीवर केली आहे. स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात तिरंगा रॅलीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात भारतीय विचार मंच तर्फे प्रबोधन आणि जनजागृतीसाठी वीर सावरकरांच्या जीवनावरील व्याखान आयोजित करण्यात आले होते. यावेळी शरद पोंक्षे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शरद पोंक्षेंनी राहुल गांधींवर सडकून टीका केली.

यावेळी शरद पोंक्षे म्हणाले, “तू गांधी नाही अन् सावकर देखील नाही. हे काही ओरिजनल गांधी नसून तर खान आहेत. महात्मा गांधींचे वंशजही नाहीत. गांधींच्या आडनावांचा फायदा यांनी घेतला. मुळचे हे फिरोज खान हाच यांचा इतिहास आहे. या मुर्खांना त्यांच्या आजीचा इतिहास माहीत नाही. मग सावरकरांचा इतिहास कसा माहिती असणार?, असा सवाल करत त्यांनी टीका केली. हे व्याख्यानाचे आयोजन मालेगावातील सटाणा नाका येथील श्रीलक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमात दादा भुसे देखील उपस्थितीत होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : देश ‘त्या’ शुभ घटनेची वाट पाहतोय, संजय राऊतांचा आशावाद

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ पुन्हा प्रयोग

शरद पोंक्षे यांचे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक चांगले गाजले आहे. पण या नाटकाला मोठा विरोध देखील झाले आहेत. या नाटकाचे पुन्हा प्रयोग करण्याचा निर्णय शरद पोंक्षेंनी घेतला आहे. या संदर्भातील शरद पोंक्षेंनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पुन्हा ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक रंगमंचावर घेऊन येण्याची घोषणा केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -