कोकणात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे तांदळाच्या पिठाच्या पातोळ्या. अशातच आता श्रावणा महिना सुरु झाला आहे. त्या निमित्त्याने घरी बनवा तांदळाच्या पिठाच्या लुसलुशीत पातोळ्या. जाणून घेऊया साहित्य आणि कृती….
साहित्य
- हळदीची पाने
- 1 कप तांदळाचे पीठ
- 1.5 कप ओले खोबरे किसून
- 1/2 कप गूळ
- 3 चमचे तूप
- 1/4 चमचा वेलची पावडर
- चवीनुसार मीठ
कृती
- प्रथम ओले खोबरे, गुळ, वेलची एकत्र शिजावून सारण करून घ्या.
- एक वाटी पाणी उकळून त्यात तूप आणि मीठ टाका व नंतर तांदळाचे पीठ टाकून एक उकड काढून घ्या.
- हे पीठ थोडेसे थंड झाल्यावर व्यवस्थित मळून घ्या.
- आता पिठाचे छोटे छोटे गोळा करा. आणि हळदीच्या पानाला पाण्याचा हलकासा हात लावून त्याला दोन्ही बाजूला पसरा.
- पानाच्या एका बाजूला सारण पसरा आणि पान दुमडून ठेवा.
- सर्व पाने तयार झाल्यावर मोदक पात्रात उकडून घ्या.
- गरमा गरम लुसलुशीत आता तयार आहेत.
हेही वाचा :
नागपंचमीला बनवा दूध आणि तांदळाची खीर
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -